Uddhav Thackeray & Eknath Shinde To Be United: उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट लोकसभा निवडणूक संपल्यावर एकत्र येऊन भाजपमध्ये सामील होणार, या दाव्यासह साम टीव्हीच्या बातमीचा स्क्रीनशॉट तुफान शेअर केला जात आहे. आपण पाहू शकता की व्हायरल स्क्रीनशॉटवर साम टीव्ही चॅनलचे लोगो आणि ग्राफीक्स दिसते. बातमीमध्ये लिहिले होते की, “लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपाबरोबर जाणार.” अनेक युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्येही लिहिले होते की, “उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.” फॅक्ट क्रेसेंडॉने यासंदर्भात केलेल्या तपासात या व्हिडीओचा मूळ संबंध वंचित बहुजन आघाडीशी असल्याचे समजतेय.
काय होत आहे व्हायरल?
तपास:
सर्वप्रथम असा कोणता निर्णय झाला असता तर ही सर्वात बातमी ठरली असती. परंतु, उबाठा गट आणि शिंदे गट एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार अशी बातमी कोणत्याही माध्यमांवर आढळलेली नाही. कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटमधील वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
साम टीव्ही चॅनलने १५ मे रोजी आपल्या युट्यूब चॅनलवरून बातमीचा व्हिडीओ अपलोड केला होता. यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात वंचित बहुजनचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करत म्हटलं होतं की, “निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही.”
साम टीव्हीने १४ मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या कल्याणमधील सभेतील भाषणाचे थेट प्रक्षेपण केले होते.
या भाषणात प्रकाश आंबेडकर २८:१२ मिनिटांवर बोलतात की, “एकनाथ शिंदेंसह ठाकरेंचा समझोता झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको. चर्चा सुरू झाली आहे. आपण ऐकलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणाले होते की, जर उद्धव ठारकेंना काही अडचण आल्यास मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही.”
तसेच ते पुढे सांगतात की, “लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे भाजपाबरोबर जाणार म्हणून काँग्रेसनेदेखील उबाठा सेनेपासून फारकत घेतली आहे.”
प्रकाश आंबेडकारांनी केलेल्या वक्तव्यवर अंबादास दानवेंनी पत्रकारांना सांगितले की, “आमच्या पक्षातून जे निघून गेले त्यांना पुन्हा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश मिळणार नाही.” याआधी अनेकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ एकत्र येणार अशा अफवा व्हायरल झाल्या होत्या.
निष्कर्ष: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपासह युती साधणार असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. व्हायरल स्क्रीनशॉट खोट्या दाव्यांसह शेअर केले जात आहे.
हे ही वाचा<< Video: उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितलं मोदींसाठी मत? म्हणाले, “काँग्रेसकडे एक तरी चेहरा..”, ‘ही’ सभा कधी झाली?
अनुवाद : अंकिता देशकर
(ही कथा मूळतः फॅक्टक्रेसेंडॉने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ताने पुनर्प्रकाशित केली आहे.)