भारतात सध्या Reliance Jio , VI आणि Airtel या आघाडीच्या कंपन्या आहेत. त्यामध्ये जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपली ५जी सेवा अनेक शहरांमध्ये सुरु केली आहे. वोडाफोन आयडिया कंपनीला आपले ५जी नेटवर्क अजून सुरु करता आलेले नाही आहे. मात्र कंपनी त्यावर काम करत आहे. एकीकडे या सर्व कंपन्या आपल्या ५ जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला BSNL ही सरकारी टेलिकॉम कंपनी अजूनही आपल्या ४ जी नेटवर्कवरच काम करत आहे.

खरेतर अजूनही बीएसएनएल कंपनी आपले ४जी नेटवर्क लॉन्च करू शकलेली नाही आहे. कंपनी ४जी नेटवर्क सुरु करण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये काम करत आहे. नुकताच बीएसएनएलने आपला एक पायलट प्रोजेक्ट पंजाब राज्यात सुरु केला होता. आतापर्यंत बीएसएनएलने १३५ टॉवर्स इंस्टॉल केले आहेत. अजून ७५ टॉवर्सवर कंपनी काम करत आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

हेही वाचा: Apple पाठोपाठ ‘ही’ कंपनीसुद्धा भारतात स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत; आतापर्यंत लॉन्च केला फक्त एकच स्मार्टफोन

बीएसएनएलचे सगळे टॉवर्स इन्स्टॉल झाल्यावर तीन महिने कंपनी याचे टेस्टिंग करणार आहे. त्यानंतर कंपनी ४जी नेटवर्क वरील आपल्या कामाचा वेग अधिक तीव्र करेल. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, ”पायलट प्रोग्रॅम संपल्यानंतर देशभरात बीएसएनएलच्या टॉवर्सवर काम सुरु होईल. त्यामुळे दररोज २०० टॉवर्स इन्स्टॉल केले जातील. ”ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनी आपले ४जी नेटवर्क लॉन्च करू शकते असे देखील असे देखील अश्विनी वैष्णव म्हणाले.

कधी होणार लॉन्च ?

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की बीएसएनएलचे ४ जी नेटवर्क ५ जी नेटवर्कच्या रोलआउटसाठी वापरले जाईल. टेलिकॉम ऑपरेटर एक सॉफ्टवेअर अपडेट जारी करेल ज्यानंतर लोकांना 5G सेवा मिळायला सुरुवात होईल.

हेही वाचा: लॉन्च झाला १२८ जीबी स्टोरेज असणारा Tecno चा ‘हा’ स्मार्टफोन; सेफ्टी फीचर्ससह मिळणार…

३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये एअरटेलचे ५ जी नेटवर्क

भारती एअरटेल कंपनीने आपले ५जी नेटवर्क ३०० पेक्षा जास्त शहरांमध्ये सुरु केले आहे. कंपनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांना काही विशिष्ट प्लॅन्ससह अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. दुसऱ्या बाजूने रिलायन्स जिओने सुद्धा आपले ५जी नेटवर्क अनेक राज्यांमध्ये सुरु केले आहे. देशात सध्या २ टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्यांनी आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. बजेट कमी असल्यामुळे वोडाफोन-आयडिया कंपनी अजूनही आपले ५जी नेटवर्क सुरु करू शकलेले नाही आहे.