लास वेगास येथे झालेल्या Consumer Eletronic show मध्ये अनेक कंपन्यांनी लॅपटॉप्स, मॉनिटर्स आणि अनेक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपले नवीन मॉडेल्सचे लाँचिंग केले. हा वर्षातील सर्वात मोठा टेक शो होता. आधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स या शो मध्ये बघायला मिळाले. अनेक कार उत्पादन करणाऱ्या कंपन्या या मॉडेल्स लाँच करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्स याचा वापर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BMW ने सादर केली रंग बदलणारी कार

CES २०२३ या टेक शो मध्ये BMW ने ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कार लाँच केली आहे. ज्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जे पूर्वी BMW च्या iX फ्लो यामध्ये वापरले होते त्याचे CES २०२३मध्ये लाँचिंग करण्यात आले. या मॉडेलमध्ये मिश्र रिअ‍ॅलिटी स्लाइडर आणि एक डेव्हलप डिस्प्ले देखील येतो.

हेही वाचा : BMW बदलणार ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग; जाणून घ्या नक्की काय आहेत फीचर्स ?

सोनीची ‘Afeela’ इलेक्ट्रिक कार

यावर्षीच्या CES २०२३ मधील सर्वात मोठी बातमी म्हणजे सोनी कंपनीची येणार नवीन इलेट्रीक कार ‘Afeela.’ ही कार २०२६ मध्ये लाँच होणार असून यासाठी सोनी कंपनीने Honda सोबत ही कार विकसित केली आहे. यामध्ये Qualcomm तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये याच्या प्रिऑर्डर्स ओपन होतील. २०२६ च्या सुरुवातीस नॉर्थ अमेरिकेत याच्या विक्रीला सुरुवात होईल. वॉकमन, प्लेस्टेशन आणि ट्रिनिट्रॉन टीव्हीसह हिटसाठी प्रसिद्ध असलेली सोनी कंपनी अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक कारवर काम करत आहे. CES 2020 मध्ये, Sony ने Vision-S 01 प्रोटोटाइपची सुरुवातीची व्हर्जन आणले होते. इलेक्ट्रिक कारच्या डिझाईन आणि निर्मितीसाठी मोठा खर्च येतो. व्हॅक्यूम्स आणि हँड ड्रायर्ससाठी प्रसिद्ध असलेली ब्रिटीश कंपनी डायसन इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर काम करत होती पण जास्त खर्चामुळे त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : CES 2023: सोनी कंपनीची ‘Afeela’ इलेक्ट्रिक कार २०२६ मध्ये लाँच होणार

हरमनचा AR हेड-अप डिस्प्ले

सॅमसंगच्या मालकीचे असणारे हरमनने CES २०२३ मध्ये रेडी व्हिजन ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेड-अप डिस्प्ले लाँच केले. हेड-अप डिस्प्ले वाहनाच्या सेन्सर्सचा वापर इमर्स व्हिज्युअल अ‍ॅलर्ट वितरीत करण्यासाठी करते जे ड्रायव्हरला त्यांच्या सभोवतालच्या आणि ड्रायव्हिंगच्या परिस्थितीबद्दल माहिती सांगेल.

गुडइयरचे टिकाऊ टायर्स

गाड्यांच्या इंटर्नल तंत्रज्ञानाकडे अधिक लक्ष कंपन्यांकडून दिले जात असताना टायर उत्पादन करणारी कंपनी गुडइयरने टायरचे लाँचिंग केले. या टायरमध्ये सोयाबीन तेल,रिसायकल केलेले पॉलिस्टर आणि इतर टिकाऊ गोष्टींचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cars like bmw afeela are launched with modern technology and features consumer eletronic show 2023 at las vegas tmb 01
First published on: 09-01-2023 at 12:52 IST