भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनुसार, चंद्रयान २ मधील एक्सरे स्पेक्ट्रोमीटरला पहिल्यांदाच चंद्रावर सोडियम आढळले आहे. चंद्रयान २ ने आपल्या क्ष किरण फ्लूरोसेन्स स्पेक्ट्रोमीटरने एक्सरेमधील कॅरेक्टरिस्टिक लाईमधून सेडियम शोधले आहे. याने चंद्रावरील सोडिमयचे प्रमाण माहिती होण्याचा मार्ग उघड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CLASS (चंद्रयान २ लार्ज एरिया सॉफ्ट रे एक्स रे स्पेक्ट्रोमीटर) च्या माध्यमातून चंद्रयान २ ला सोडियमचा शोध लावने शक्य झाले आहे, अशी माहिती इसरोने एक निवेदनातून दिली आहे. उच्च संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेमुळे CLASS ने सोडियमची लाईन स्पष्टपणे दाखवली आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

(केवळ २३ हजारांमध्ये मिळेल अ‍ॅपलचा ‘हा’ ५ जी फोन, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर)

सोडियम अणूंच्या पातळ लेयरपासून सिग्नल बाहेर आले असावे. सोडियमचे हे अणू लुनर कणांना कमकुवतपणे बांधलेले असतात. हे सोडियमचे अणू चंद्रावरील खनिजांमधून काढण्याऐवजी चंद्राच्या पृष्ठागातून सौर वाऱ्याने किंवा अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी सहज बाहेर काढता येऊ शकतात, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

पृष्ठभागावरील सोडियमध्ये दिवसा होणारे बदल देखील दिसून आले आहे. यामुळे एक्झोस्पिअरमध्ये अणूंचा नियमित साठा आणि ते कसे टिकते याची माहिती मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे चंद्राच्या व्हिस्पी वातावरणात हा अल्कली घटक सापडला. या वातावरणात अणूंचे एकमेकांना मिळणे फार दुर्मिळ असते. त्यामुळे, त्याचाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 detected sodium on moon ssb
First published on: 08-10-2022 at 15:21 IST