सध्या जगभरात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे एक नवीन क्रांती म्हणून पाहिले जात आहे. अनेक ठिकाणी याचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी विज्ञान आणि टेक्नॉलॉजीसंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. लोकांच्या स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे असे चंद्रचूड म्हणाले.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे IIT मद्रासच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ”आमचा इतिहास, कायदा आणि तंत्रज्ञान यांच्यातील संबंध दर्शवतो. तुमचे तंत्रज्ञान कोणत्या मूल्याचे प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या शक्यता काय आहेत? माझे तात्पर्य आर्थिक मूल्य असे नाही. परंतु त्या मूलभूत तत्वांसाठी आहे ज्यासाठी तुमचे तंत्रज्ञान उभे आहे.” याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : लवकरच Twitter ची चिमणी जाणार? एलॉन मस्क यांचे सूचक ट्वीट; म्हणाले…

तसेच सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले, महामारीच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशामध्ये व्हर्च्युअल सुनावणीची सुरुवात केली आणि न्यायालयांनी आतापर्यंत ४३ मिलियन व्हर्च्युअल सुनावण्या घेतल्या आहेत. यामुळे विशेषतः महिला वकिलांना मदत झाली आहे ज्यांना त्यांच्या घरातील जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास अडचणी येतात.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऑनलाईन गैरवर्तन आणि ट्रोलिंगसारख्या नवीन गोष्टींना जन्म दिला आहे. जेव्हा असे वर्तन समोर येईल तेव्हा वैज्ञानिक विकास आणि वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायद्याला त्यात हस्तक्षेप करावा लागेल असे सरन्यायाधीश चंद्रचूड आयआयटी मद्रासच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हणाले. AI बाबत बोलताना चंद्रचूड म्हणाले, कार्यक्षमता वाढविण्यासाठी ते वेगाने तैनात केले जात आहे. ”सर्वोच्च न्यायालयातही, न्यायालयीन कामकाजाच्या थेट लाइव्ह ट्रान्सस्क्रिप्शनसाठी AI ची चाचणी केली जात आहे. ”

हेही वाचा : WhatsApp ने आणले नवीन फिचर, ‘या’ वापरकर्त्यांना एकाच वेळी १५ जणांना करता येणार ग्रुप कॉल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाईन गैरवर्तन आणि छळ हे मुक्त अभिव्यक्तीला रोखू शकतात. ”भारतात मोठ्या संख्येने लोकं त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रभावीपणे वापर करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे आवश्यक संसाधने आणि सार्वजनिक वस्तूंचा अभाव आहे. संधींचा विस्तार करण्यात तंत्रज्ञानाने भूमिका बजावली पाहिजे.” चंद्रचूड म्हणाले.