सध्या Open AI ने विकसित केलेले ChatGpt हे चांगलेच चर्चेत आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. ओपन एआयच्या चॅटबॉट ‘चॅट जीपीटी’ने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या चॅटबॉटने अवघ्या २ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १०० दशलक्ष वापरकर्त्यांचा आकडा पार केला आहे.

अर्थात याच्याशी स्पर्धा करण्यासाठी टेक कंपनी Google ने देखील आपला चॅटबॉट Bard लॉन्च केला आहे. AI सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी एका मुलाखतीदरम्यान चॅटजीपीटीबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ChatGpt बद्दल बिल गेट्स काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

Congress Leader Rahul Gandhi slam modi government
 ‘रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे’ 
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
BOI Officer Recruitment 2024
BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जर्मन बिझनेस दैनिक Handelsblatt ला मुलाखत दिली. OpenAi चा चॅटजीपीटी हा चॅटबॉट हे जग बदलू शकते असे या मुलाखतीदरम्यान बिल गेट्स म्हणाले आहेत. चॅटजीपीटी लॉन्च झाल्यावर इंटरनेटवर एकच खळबळ उडाली होती. ते म्हणाले की , आतापर्यंत AI टूल्स केवळ वाचू आणि लिहू शकत होते पण आता चॅटजीपीटी सारखे टूल्स कंटेन्ट समजून घेत आहेत आणि वेगाने प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

हेही वाचा : Video: Google ला मोठा झटका; नवीन एआय ‘Bard’ने केलेल्या ‘या’ चुकीमुळे गमावले १०० अब्ज डॉलर्स

खरेतर जेव्हा OpenAI ने ChatGpt बाजारात लॉन्च केले तेव्हापासून ते टेक्नोलॉजी क्षेत्रात सतत चर्चेत राहिले आहे. हा चॅटबॉट पाहून मोठ्या टेक कंपन्यांची झोपडली होती. याच्याशी स्पर्धा करण्यासाठी अनेक टेक कंपन्या या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Google , Microsoft आणि आता Opera देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या सर्व कंपन्या आपापल्या ब्राऊझरवर चॅटबॉट सारखी फीचर्स आणत आहेत.