सध्या कॉलेज ऍडमिशनचा सीझन सुरु झालाय. ११ वी चे ऍडमिशन घेताना आपल्याला कॉलेज मध्ये तुमच्या प्रवेश अर्जासह काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा जमा करायची असतात. कितीही खबरदारी बाळगली तरी अनेकदा असं होतं की, एखादं डॉक्युमेंट घरी राहून जातं, अशावेळी जर का तुमच्याकडे त्या डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी असेल तर जवळपास सायबर गाठून तुम्ही थेट प्रिंट काढून घेऊ शकता. कॉलेज जवळचं सायबर किंवा दुकान म्हंटलं तर तिथे गर्दी किती असणार हे सांगायला नकोच! अशावेळी मेल करत बसण्यापेक्षा किंवा अगदी Whatsapp करण्यापेक्षा तुम्ही थेट तुमच्या मोबाईल मधून प्रिंट कमांड देऊ शकता. यासाठी दुकान मालकाची आधी परवानगी घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक अँड्रॉइड फोन मध्ये तसेच Iphone मध्ये सुद्धा थेट मोबाईल मधून प्रिंट देण्याची सुविधा असते. यासाठी तुमचा फोन व प्रिंटर एकाच वाय- फायला जोडलेला असावा. हॉटस्पॉट वापरून सुद्धा आपण प्रिंटर आपल्या फोनशी जोडू शकता. यानंतर प्रिंट कशी द्यायची हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

अँड्रॉइड फोन मधून कशी द्याल प्रिंट?

  • तुम्हाला जी फाईल प्रिंट करायची ती उघडा
  • मेन्यू बटण वर क्लिक करा, वरच्या कोपर्यात जे तीन बिंदू असतात तिथे क्लिक करून मेन्यू सुरु होतो
  • त्यातच समोर तुम्हाला प्रिंट पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
  • वरील बाजूस असलेल्या ड्रॉप- डाऊन बाणावर क्लिक करा
  • तुम्हाला हव्या त्या प्रिंटरशी फोन जोडा
  • प्रिंट पर्यावर क्लिक करा

iPhone मधून कशी द्याल प्रिंट?

iPhone मधून आपण AirPrint वापरून सुद्धा प्रिंट देऊ शकाल

  • तुम्हाला जी फाईल प्रिंट करायची ती उघडा
  • शेअर बटणावर क्लिक करा
  • तिथे आपल्याला प्रिंट पर्याय दिसेल
  • सिलेक्ट प्रिंटर वर क्लिक करा आणि तुम्हाला हवा तो प्रिंटर निवडा
  • प्रिंट द्या.

JIO 4G Add-on Plans: 100% डेटा संपल्यावर चिंता नाही! 15 रुपयांत मिळवता येईल बोनस इंटरनेट, पहा हे स्वस्त प्लॅन्स

याशिवाय जर का आपण खाजगी प्रिंटरचा वापर करत असाल किंवा फोन व प्रिंटर एका वाय- फायला जोडलेले नसेल तर आपल्याला यूएसबीचा वापर करून सुद्धा प्रिंट देता येते. आपल्याला प्रिंट कस्टमाइज करून हवी असल्यास म्हणजेच कागदाची साईझ, प्रिंटचा रंग इत्यादी गोष्टी बदलून हव्या असल्यास प्रिंटर शेअर मोबाईल प्रिंट या गूगल प्ले स्टोअर वरील ऍप्लिकेशनचा वापर करा. अगदी सोप्या पद्धतीने आपण काही सेकेंदात प्रिंट मिळवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College admission tips how to print directly from mobile android and iphone know steps svs
First published on: 05-08-2022 at 10:17 IST