क्रेडिट कार्ड लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल प्रत्येकजण त्याचा वापर करत आहे. क्रेडीट कार्डचा वापर योग्य आणि चतुराईने झाला तर ते फायदेशीर ठरते. जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना आता मोफत जेवण आणि नाश्ता मिळणार आहे. जाणून घ्या या ऑफरचा कसा लाभ घेता येणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा होणार फायदा ?
तुम्ही विमानाने कुठेही प्रवास करत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायला हवे. हे कार्ड एअरपोर्ट लाउंजमध्ये खूप उपयुक्त आहे. या कार्डांच्‍या मदतीने तुम्‍हाला आंतरराष्‍ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांच्‍या लाउंजमध्‍ये मोफत प्रवेश मिळू शकतो. याशिवाय, तुम्हाला तेथे अनेक फायदे मिळतील. तुम्हाला मोफत वायफाय सुविधा दिली जाईल. विमानतळावर चहा, कॉफी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असते. त्यामुळे तुम्ही ही क्रेडिट कार्डे वापरावीत.

आणखी वाचा : व्हॉट्सॲपने आणले जबरदस्त फीचर! आता ‘ग्रुप चॅटमध्ये पाहता येणार…’

‘या’ पद्धतीने करा वापर

तुमच्याकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असतील तर या कार्डसह, तुम्हाला एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळेल कारण कार्ड नेटवर्क कंपन्या लाउंजशी टायअप करतात.

अनेक कार्डे ही सुविधा फक्त देशांतर्गत विमानतळावर देतात, तर काही कार्डे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवर मोफत लाउंज प्रवेश देतात.

‘या’ कार्ड्सवर मिळतील फायदे

एचडीएफसी बँक मिलेनिया डेबिट कार्ड हे सर्वात प्रसिद्ध कार्ड आहे, त्याची वैशिष्ट्ये आश्चर्यकारक आहेत. तुम्हाला ICICI Coral RuPay क्रेडिट कार्ड आणि Axis Bank क्रेडिट कार्डवर देखील मोफत प्रवेश मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credit card holders will now get free meals and snacks pdb
First published on: 31-10-2022 at 15:51 IST