जगभरातील अनेक कंपन्या दरवर्षी ब्लॅक फ्रायडे सेलचे आयोजन करतात. त्यामध्ये कित्येक प्रॉडक्ट्सवर म्हणजेच स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत दिली जाते. तर आज २४ नोव्हेंबरपासून जगभरात ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होत आहे. त्यानिमित्त आयफोनवर खास ऑफर देण्यात आली आहे. काय आहे ही खास ऑफर चला पाहू…
आयफोन (iPhone 15) आठ हजार (८,०००) रुपयांच्या सवलतीच्या ऑफरसह उपलब्ध आहे; जी खूप चांगली आहे. कारण- ॲपलने भारतात फक्त तीन महिने आधीच हा फोन लाँच केला आहे. आता ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यान इन्व्हेंट ॲपल (iNvent) स्टोअर आयफोनवर ऑफर देत आहे. इन्व्हेन्ट हा ॲपल कंपनीचा अधिकृत विक्रेता आहे. ब्लॅक फ्रायडे सेल ऑफरमध्ये त्यांनी आयफोनची १५ ची किंमत कमी केली आहे. जर तुम्ही आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आठ हजार रुपयांच्या सवलतीच्या ऑफरसह आयफोन १५ (iPhone 15) उपलब्ध :
ब्लॅक फ्रायडे सेल ऑफरमध्ये इन्व्हेंट स्टोअरच्या वेबसाइटवर आयफोन १५ सध्या ७६,९००रुपयांच्या किमतीसह उपलब्ध आहे. आयफोनची मुख्य किंमत ७९,९०० रुपये आहे. याचा अर्थ ग्राहकांना ३,००० रुपयांची सवलत मिळणार आहे. तसेच खरेदीदरम्यान एचडीएफसी (HDFC) बँक कार्डाचा उपयोग केल्यास ग्राहकांना ५,००० रुपयांची कॅशबॅकची ऑफरदेखील आहे. एकंदरीतच या सर्व गोष्टींमुळे आयफोन १५ तुम्हाला ७१,९०० पर्यंत मिळणार आहे.पण, महत्त्वाची गोष्ट अशी की, आयफोन १५ च्या (iPhone 15) काळ्या रंगाच्या मॉडेलवरच ही ऑफर उपलब्ध आहे.
तगड्या ऑफरमध्ये मिळणारा आयफोन १५ ग्राहकांनी खरेदी करावा की नाही?
आयफोन १५ हा एक उत्तम फोन आहे ; त्यात फोर के (4K) सिनेमॅटिक मोड, वेगवान चिपसेट, नवीन पंच-होल (Punch-Hole) डिस्प्ले डिझाइन व यूएसबी-सी (USB-C) पोर्ट समर्थनासह नवीन ४८-मेगापिक्सेल कॅमेरा सिस्टीमसह येते.आता यूएसबी-सी पोर्ट असण्याचा फायदा असा आहे की, तुम्हाला आयफोन १५ साठी वेगळी चार्जिंग केबल तसेच अडॅप्टर सोबत ठेवण्याची गरज नाही. तुम्ही कुटुंबासह प्रवास करताना तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडे असलेले कोणतेही टाईप सी चार्जर वापरू शकता.
आयफोन १५ या नवीन मॉडेलमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत थोडा ब्राईट डिस्प्ले आहे. आयफोन वायरलेस चार्जिंग आणि आयपी ६८ (IP68) रेटिंगला सपोर्ट करतो. या सर्व गोष्टींचा विचार करून, आयफोन १५ हा खरेदीसाठी उत्तम ठरेल. कारण- हा नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर अगदीच कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. जर तुमचे बजेट सुमारे ५०,००० हजार रुपये असेल, तर तुम्ही आयफोन १३ ॲमेझॉनद्वारे विकत घेण्याचा विचार करू शकता. कारण- हा 5G फोन आहे. तसेच अनेकदा मोठ्या कार्यक्रमांदरम्यान आयफोन १३ खरेदी करण्याचा सल्लासुद्धा दिला जातो. ज्या ग्राहकांचे बजेट थोडे जास्त आहे ते आयफोन १५ विकत घेण्याचा विचार करू शकतात.