Isro Chandrayaan 3 mission : अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेले काही महिने चर्चेत असलेल्या इस्रोच्या (ISRO) चांद्रयान ३ ( Chandrayaan 3 ) मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १४ जुलैला दुपारी दोन वाजून ३५ मिनीटांनी आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटा इथून चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार आहे. त्या दिवसाची आणि वेळेची घोषणा आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO ( indian space research organisation ) ने केली आहे.

इस्त्रोचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे LVM3-M4 हे महाकाय रॉकेट – प्रक्षेपक हे उड्डाणाच्या ठिकाणी Chandrayaan-3 ला घेऊन पोहचले आहे. आता लवकरच त्यामध्ये इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि हवामान अनुकूल असेल तर नियोजित वेळी रॉकेट गर्जना करत अवकाशात झेप घेईल.

हेही वाचा… तब्बल ११ वर्षानंतर Mark Zuckerberg यांनी केलं ट्वीट, नेमका विषय काय?

Chandrayaan-3 चे उड्डाण हे जरी १४ जुलैला होणार असले तरी चंद्रावर उतरण्यासाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. अवकाशात गेल्यावर Chandrayaan-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालतांना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच Chandrayaan-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर लॅडरनधून रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा… घरच्या घरी फोन स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या या सोप्या टिप्स

ही मोहिम यशस्वी झाली तर चंद्रावर अलगद यान आणि रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद्रयान २ मोहिमेत काय झालं होतं ?

चांद्रयान २ मोहिम ही जुलै २०१९ ला झाली आणि ऑगस्ट महिन्यात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वेग नियंत्रित न झाल्याने चंद्रावर उतरणारे लॅडर हे चंद्राच्या जमिनीवर आदळळे होते आणि त्याचे तुकडे झाले होते. मात्र या मोहिमेत चंद्राभोवती एक उपग्रह हा कक्षेत स्थिर करण्यात इस्त्रोला यश आले होते. हा उपग्रह चंद्राभोवती अजुनही फिरत असून त्याने चंद्राच्या जमिनीचा नकाशा तयार केला आहे.