दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज, चित्रपट आणि काही शोज (Show) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. मनोरंजनचा अधिक लाभ घेण्यासाठी डिस्नी प्लस, नेटफ्लिक्स , ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पासवर्ड शेअरिंगचासुद्धा पर्याय आहे. म्हणजेच जर तुम्ही या ॲपपैकी एकच सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर तुम्ही इतरांबरोबर तुमचा पासवर्ड शेअर करू शकता. पण, काही कंपन्यांनी यावरसुद्धा निर्बंध घातले आहेत. तर आता हे बघता डिस्नी कंपनीसुद्धा जून महिन्यापासून पासवर्ड शेअरिंग ही सुविधा बंद करणार आहे.

डिस्नीची सीईओ बॉब इगर यांच्या मुलाखतीवर आधारित व सीएनबीसीच्या अहवालानुसार येत्या जून महिन्यापासून डिस्नी प्लॅटफॉर्मचे मार्जिन, नफ्यातील वाढ लक्षात ठेवून ग्राहकांच्या पासवर्ड शेअरिंगसाठी मोठा निर्णय घेते आहे. कंपनी जूनमध्ये काही निवडक देश आणि काही मार्केट्समध्ये पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद करण्यास सुरुवात करेल आणि नंतर सप्टेंबर महिन्यात सर्व ग्राहकांसाठी हे रोलआऊट करण्यात येईल. त्यामुळे आता एका युजरचा पासवर्ड वापरून त्याचे मित्र डिस्नी प्लसचा वापर करू शकणार नाहीत.

हेही वाचा…आता प्रवास होईल अधिक सोपा; Google Maps च्या ‘या’ १० फीचर्सबद्दल जाणून घ्या…

स्ट्रीमिंग स्पेसमध्ये डिस्नीच्या वाढीबद्दल बोलताना डिस्नीची सीईओ इगर म्हणाले, ‘अगदी कमी वेळेत जागतिक स्ट्रीमिंग व्यवसायात आम्ही नेटफ्लिक्सच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण, कंपनीला आता मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्याचे आम्ही ठरवले आहे’; असे ते यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्सने २०२३ मध्ये पासवर्ड शेअरिंग ही सुविधा बंद करून सबस्क्रिप्शन फी (Fee) देखील वाढवली. तरीही २०२३ च्या पहिल्या नऊ महिन्यांत १६ मिलियन (दशलक्ष) पेक्षा जास्त युजर्सच्या संख्येत वाढ झाली होती. तसेच या व्यतिरिक्त अनेक स्ट्रीमिंग ॲपने या सुविधेवर निर्बंध घातला, तर ही बाब लक्षात घेता आता डिस्नी प्लसनेसुद्धा हे पाऊल उचललं आहे. कंपनीकडून परवानगी दिल्याशिवाय वापरकर्ते त्यांचे पासवर्ड घराबाहेर असणाऱ्या सदस्यांबरोबर शेअर करू शकणार नाहीत आणि एकाच वेळी एकाधिक डिव्हाइसेसवर चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार नाहीत.