scorecardresearch

मायक्रोसॉफ्टनंतर आता IBM कंपनी करणार नोकरकपात; ३९०० कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.

IBM company Layoff
IBM – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

IBM Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple व Microsoft , Spotify या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. कंपनीमध्ये कमर्चाऱ्यांची कपात अजून थांबलेली दिसत नाही. तसेच आयबीएम कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कंपनीने केलेली कर्मचाऱ्यांच्या कपातीचे कारण जाणून घेऊयात.

आयबीएम ही एक टेक कंपनी असून, या कंपनीने ३,९०० कमर्चाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. या मागचे कारण हे कंपनी आपली काही मालमत्ता विकत आहे, त्यामुळेच ही कपात करण्यात येत आहे.

हेही वाचा : Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

IBM कंपनी अजूनही क्लायंट-फेसिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हानॉफ यांनी एका जागतिक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. कर्मचाऱ्यांची होणारी कपात ही त्याच्या किंडरिल व्यवसायाच्या स्पिनऑफशी आणि त्याच्या AI युनिट वॉटसन हेल्थच्या भागाशी संबंधित आहे ज्यावर जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये ३०० करोड डॉलरचे शुल्क लागणार आहे. टाळेबंदीनंतर कंपनीचे शेअर २ टक्क्यांनी घसरले आहेत.

साध्य अनेक मोठ्या टेक कंपन्या ते स्ट्रीट बँकिंगपर्यंत सर्वच जण जागतिक आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी आपल्या खर्चामध्ये कपात करत आहेत. आयबीएम २०२२ चा कॅश फ्लो हा ९.३ बिलियन डॉलर इतका होता. जे त्याच्या १० बिलियन डॉलरच्या टार्गेटपेक्षा कमीच आहे. IBM ने ऑक्टोबरमध्ये पश्चिम युरोपमधील नवीन बुकिंगमध्ये मंदीचे संकेत दिले होते.

हेही वाचा : शेअरचॅटमध्ये होणार नोकरकपात; ४०० कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी

२ डिसेंबर रोजी त्याच्या हायब्रीड क्लाउडच्या महसुलामध्ये ३१ टक्क्यांची वाढ झाली. Refinitiv नुसार विश्लेषकांच्या १६. ६९ अब्ज डॉलरच्या अंदाजाच्या तुलनेत एकूण महसूल १६.४० अब्ज डॉलरवर स्थिर होता. आयबीएम कंपनीने २०२२ मध्ये ५.५ टक्के महसूल वाढीचा अंदाज लावला आहे. जो या १० वर्षांमधील सर्वात मोठा अंदाज आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 11:34 IST