Twitter New Logo Dogecoin : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत. यावर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

ट्विटरच्या लोगोत बदल झाल्यानंतर अनेकांना आधी ट्विटर हॅक झाले की काय असं वाटलं. मात्र, नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला आणि ट्विटरचा लोगो बदलण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झालं.

या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर केलं. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.

नेमका काय बदल?

हेही वाचा : ट्विटरमध्ये १५ एप्रिलपासून मोठे बदल; फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच मिळणार विशिष्ट लाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेथे जेथे निळी चिमणी दिसत होती तिथं तिथं श्वानाचा लोगो दिसत आहे. ट्विटर पेज रिफ्रेश केल्यानंतरही सुरुवातीला हाच श्वानाचा लोगो दिसतो आणि मग होम पेज ओपन होते. ट्विटरच्या साईटवर डावीकडे सर्वात वरच्या बाजूला हा निळ्या चिमणीच्या जागी श्वानाचा लोगो दिसत आहे.