Elon Musk Shared Screenshot : टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk ) यांना बिझनेसशिवाय गेम खेळायला देखील खूप आवडते. याचा खुलासा त्यांनी याआधीच केलेला आहे. तर याचसंबंधित एक माहिती समोर येते आहे. टेक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी चिटिंग (फसवणूक) केल्यामुळे ‘पाथ ऑफ एक्साइल २’ (Path of Exile 2) च्या व्हिडीओ गेममधून त्यांना काढून टाकण्यात आले आहे. एलॉन मस्क डायब्लो ४ या दुसऱ्या व्हिडीओ गेमच्या लीडरबोर्डच्या टॉपला आल्यानंतर हे घडले आहे, असे सांगितले जाते आहे.

एलॉन मस्कने नोव्हेंबरमध्ये दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधीत डायब्लो ४ लेव्हल १५० पिटमधून गेमिंग रेकॉर्ड तोडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर ‘जो रोगन’ला दिलेल्या मुलाखतीत मस्कने खुलासा केला होता की, ‘तो डायब्लो IV मधील जागतिक टॉप २० खेळांपैकी एक आहे, जो जगभरात सुमारे सहा दशलक्ष लोक खेळतात’.

एलॉन मस्कला (Elon Musk) गेममधून का काढण्यात आले?

अब्जाधीश एलॉन मस्कने अलीकडेच ‘पाथ ऑफ एक्साइल’ नावाच्या दुसऱ्या व्हिडीओ गेममधून बाहेर काढल्याचा अनुभव शेअर केला. मस्कने एक्स (ट्विटर) वर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये “तुम्ही बहुतेक ॲक्शन खूप जलद केल्यामुळे तुम्हाला गेममधून काढून टाकण्यात आले आहे’, अशी सूचना गेमवर आलेली दिसते आहे.

हेही वाचा…Jio New Year Welcome Plan : २०२५ रुपयांचा करा रिचार्ज आणि सात महिने टेन्शन फ्री राहा; वाचा जिओच्या न्यू इयर प्लॅनबद्दल

पोस्ट नक्की बघा…

एलॉन मस्कने (Elon Musk ) स्पष्ट केले की, गेममध्ये जिंकण्यासाठी तो कोणतेही ‘मॅक्रो’ किंवा ऑटोमेटेड सिक्वेन्स वापरत नाही किंवा त्याचा फायदा घेत नाही. हे वाचून या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, ‘ पाथ ऑफ एक्साइलच्या निर्मात्यांनी १० प्लस ॲक्टिव्ह स्किल् दिल्यानंतर लोक ते वापरतील अशी अपेक्षा नव्हती.’ तर यावर उत्तर देत एलॉन मस्क म्हणाला की, खूप जास्त क्लिक्स/सेकंदाचा दंड म्हणजे तुम्हाला ताबडतोब अमलात आणले जाईल! मला वाटते की हे पॅच होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्कची गेमिंग स्टुडिओ सुरू करण्याची योजना

मस्कने या वर्षाच्या सुरुवातीला पॉडकास्टर ‘जो रोगन’ यांच्याशी झालेल्या संभाषणात गेमिंगचा त्याच्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांबद्दल सांगितले. व्हिडीओ गेम खेळताना मला गेमवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तेव्हा मला शांत बसावे लागते.’ गेल्या महिन्यातच एलॉन मस्कने एक्स एआय (xAI) कंपनी अंतर्गत स्वतःचा गेमिंग स्टुडिओ सुरू करण्याची योजनादेखील जाहीर केली. @xAI गेम पुन्हा उत्कृष्ट बनवण्यासाठी AI गेम स्टुडिओ सुरू करणार आहे!” असे मस्क यांनी गेल्या महिन्यात एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले होते.