आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात. त्यामुळे फोन चार्जिंग करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यासाठी युरोपियन युनियन देश वर्षाच्या अखेरीस मोबाइल फोन, टॅब्लेट आणि हेडफोनसाठी एकाच चार्जिंग पोर्टवर करार करण्याची शक्यता आहे. याबाबती माहिती एका खासदाराने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मंगळवारी दिली. युरोपियन कमिशनने दशकापूर्वी सिंगल मोबाइल चार्जिंग पोर्ट ब्रॉच केले होते. परंतु गेल्या वर्षी कंपन्यांनी सामायिक समाधानावर सहमती दर्शविण्यास असमर्थता दाखवल्याने जगातील पहिल्या कायद्याचा मसुदा प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास Samsung आणि Huawei आणि इतर डिव्हाइस निर्मात्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर या प्रस्तावावर आयफोन निर्माता अ‍ॅप्पलने जोरदार टीका केली आहे.

२०१९ च्या आयोगाच्या अभ्यासानुसार, २०१८ मध्ये मोबाइल फोनसह विकल्या गेलेल्या निम्म्या चार्जरमध्ये यूएसबी मायक्रो-बी कनेक्टर होते. तर २९ टक्के फोनमध्ये USB-C कनेक्टर आणि २१ टक्के लाइटनिंग कनेक्टर होते. युरोपियन संसदेत या समस्येचे नेतृत्व करणारे आमदार अ‍ॅलेक्स अ‍ॅगियस सलिबा म्हणाले की, त्यांना आशा आहे की विधानसभा मे महिन्यात त्यांच्या प्रस्तावावर मतदान करण्यास सक्षम असेल, त्यानंतर त्यांना अंतिम मसुद्यावर युरोपियन युनियन देशांशी चर्चा सुरू करण्याची परवानगी मिळेल. “वर्षाच्या अखेरीस करार शक्य आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असं त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

WhatsApp यूजर्सही फेसबुकप्रमाणे कव्हर फोटो ठेवू शकतील, जाणून घ्या काय आहे अपडेट

दुसरीकडे खासदार एगियस सालिबा यांनीही आपलं मत मांडलं आहे”आम्ही फक्त स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित केल्यास ही संधी पूर्णपणे गमावली जाईल. ई-रीडर्स, कमी क्षमतेचे लॅपटॉप, कीबोर्ड, कॉम्प्युटर माईस, इअरबड्स, स्मार्ट घड्याळे आणि इलेक्ट्रॉनिक खेळण्यांना एकच मोबाइल चार्जिंग पोर्ट हवा आहे.” सध्यातरी प्रस्तावात फक्त मोबाइल फोन, टॅब्लेट आणि हेडफोन्स आहेत. “आयोगाने २०२५ पर्यंत वायरलेस चार्जिंग सिस्टीममध्ये आणावी अशी इच्छा आहे आणि कायदा स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांनी तो अंमलात यावा, कंपन्यांना दोन वर्षांत त्यांची उपकरणे जुळवून घ्यावी लागतील.”

तुमच्या स्मार्टफोनमधून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत! ‘या’ अ‍ॅप्सच्या मदतीने रिस्टोर करा; जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅप्पलने या प्रस्तावाला विरोध करत सांगितले की, सामान्य चार्जरसाठी युरोपियन युनियनने केलेल्या दबावामुळे नाविन्याला धक्का बसेल आणि ग्राहकांना नवीन चार्जरवर स्विच करण्यास भाग पाडल्यास इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा डोंगर तयार होईल.