Fastrack ने Flipkart सह भागीदारीमध्ये आपली नवीन स्मार्टवॉच सिरीज लॉन्च केली आहे. Revoltt सीरिजचे कंपनीने लॉन्चिंग केले आहे. नवीन जनरेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने Fastrack Revoltt FS1 सह आपल्या फॅशन-टेक सेगमेंटचा विस्तार केला आहे. स्मार्टवॉच प्रेमींना आकर्षित करण्यासाठी Fastrack Revoltt FS1 मध्ये शक्तिशाली फीचर्स आणि नवीन डिझाईन देण्यात आली आहेत.RevolttInStyle हॅशटॅगसह यामध्ये १.८३ अल्ट्राव्हीयू डिस्प्ले आणि 2.5X नायट्रोफास्ट चार्जिंग फिचर मिळते. हे स्मार्टवॉच प्रगत चिपसेटसह येते जे मजबूत कनेक्टिव्हिटी आणि विजेची कार्यक्षमता प्रदान करते.

काय आहेत फीचर्स ?

Fastrack Revoltt FS1 मध्ये १.८३ इंचाचा UltraVU डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते. ज्यामध्ये सिंगलसिंक टेक्नॉलॉजी आहे. हे वॉच २०० पेक्षा जास्त फेस (चेहऱ्यांना) ला सपोर्ट करते. हे स्मार्टवॉच क्रीडाप्रेमींसाठी ११० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड ऑफर करते. हे एक फंक्शनल वॉच आहे. हेल्थ फीचर्सच्या बाबतीत स्मार्टवॉच स्ट्रेस मॉनिटर, ऑटो स्लिप ट्रॅकिंग आणि २४*७ हार्ट रेट हे फीचर्स मिळतात. हे वॉच स्मार्ट नोटिफिकेशन आणि एआय व्हॉईस असिस्टंटसह येते.

हेही वाचा : Twitter यूजर्ससाठी मोठा धक्का! आजपासून बंद होणार ‘हे’ जबरदस्त सिक्युरिटी फिचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे किंमत ?

Fastrack Revoltt FS1 हे स्मार्टवॉच २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून Flipkart.com आणि Fastrack च्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हे स्मार्टवॉच तुम्हाला Black, Blue Green आणि Teal या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात. हे स्मार्टवॉच तुम्ही १,६९५ रुपयांना खरेदी करू शकता.