Fire Boltt Talk Ultra Smartwatch भारतात लाँच झाले आहे. या नवीन स्मार्टवॉचमध्ये १.३९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले येतो. तसेच यात अनेक फीचर्स येतात . या स्मार्टवॉचमध्ये कोणकोणती फीचर्स आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Fire-Boltt Talk Ultra smartwatch चे फीचर्स

फायर बोल्ट टॉक अल्ट्रा स्मार्टवॉचमध्ये १. ३९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले येतो. तसेच ब्लूटूथ कॉलिंग येते. ज्यामुळे स्मार्टवॉचमधूनच फोन लावता येतो. तसेच यामध्ये गुगल असिस्टंट आणि सिरी सपोर्ट सारखा एआय व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील आहे. याशिवाय या वॉचमध्ये १२३ स्पोर्ट्समोड देण्यात आले आहेत. ज्यात धावणे , सायकलिंग, स्विमिंग अशा मोड्सचा समावेश आहे. SpO2 मॉनिटरिंग, डायनॅमिक हार्ट रेट ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखी फीचर्स या वॉचमध्ये देण्यात आली आहेत.

हे वॉच एकदा चार्ज केले की, ७ दिवस त्याची बॅटरी टिकते असे फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे. हे वॉच चार्ज होण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. यात १०० पेक्षा जास्त क्लाउड वॉच फेसर्स आणि स्मार्ट UI इंटरफेस देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचचे वजन ८० ग्रॅम इतके आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Amazonपासून Microsoft पर्यंत अनेक कंपन्यांकडून नोकरकपात; जाणून घ्या किती होता महिन्याचा पगार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Fire Boltt Talk Ultra Smartwatch ची काय असेल किंमत ?

फायर बोल्ट टॉक अल्ट्रा स्मार्टवॉच हे भारतात लाँच करण्यात आले आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचची किंमत १,९९९ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच वापरकर्ते फायरबोल्टच्या वेबसाइट व फ्लिपकार्ट इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकणार आहेत.