Flipkart Month-End Mobiles Fest Smartphones Deals : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची विक्री सुरू आहे. याचे नाव फ्लिपकार्ट मंथ-एंड मोबाईल फेस्ट (Flipkart Month-End Mobiles Fest) असे आहे. यामध्ये प्रत्येक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. आज आपण टॉप स्मार्टफोन ब्रँड्सच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

iPhone SE

६४ जीबी स्टोरेज असलेला आयफोन एसई फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ३९,९०० रुपयांऐवजी २९,९९९ रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह १३,००० रुपये वाचवले जाऊ शकतात आणि अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून ७५० रुपये वाचवले जाऊ शकतात. एकूणच तुम्ही हा फोन १६,२४९ रुपयांना खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A22 5G

सॅमसंगचा गॅलेक्सी ए२२ ५जी स्मार्टफोन १८,९९९ रुपयांना विकला जात असून त्याची मूळ किंमत २२,४९९ रुपये आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर ७५० रुपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरसह १३,००० रुपये वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा सॅमसंग फोन ५,२४९ रुपयांमध्ये घरी घेऊ शकता.

Realme 9 Pro+ 5G

रिअलमीचा ९ प्रो प्लस ५जी स्मार्टफोन २८,९९९ रुपयांना विकला जात आहे. याची मूळ किंमत ३१,९९९ रुपये आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला ५ हजारांची सूट मिळू शकते आणि एक्सचेंज ऑफरसह १३,००० रुपये वाचवले जाऊ शकतात. यानंतर रिअलमीचा हा स्मार्टफोन तुम्हाला १०,९९९ रुपयांना विकत घेता येईल.

Vivo V23 5G

विवोचा व्ही२३ ५जी स्मार्टफोन ३४,९९० रुपयांऐवजी २९,९९० रुपयांना विकला जात आहे. तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर दोन हजार रुपयांची सूट मिळू शकते आणि एक्सचेंज ऑफरसह १३,००० रुपये वाचवले जाऊ शकतात. यानंतर हा फोन तुम्ही १४,९९० रुपयांना खरेदी करू शकता.

Oppo Reno7 5G

ओप्पो रेनो७ ५जी स्मार्टफोन २८,९९९ रुपयांना विकला जात आहे तर त्याची मूळ किंमत ३७,९९० रुपये आहे. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर ३ हजार रुपयांची सूट मिळू शकते आणि एक्सचेंज ऑफरसह १३,००० रुपये वाचवले जाऊ शकतात. यानंतर तुम्ही हा फोन १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.