Who Is Prafulla Dhariwal Behind Chatgpt Ghibli Features : काही आठवड्यांपूर्वी ओपनएआयच्या चॅट जीपीटीने नुकतेच युजर्ससाठी नवी इमेज जनरेटर सेवा सुरू केली आहे. या इमेज जनरेटर सेवेचे नाव ‘घिबली स्टुडिओ’ असे आहे. आपले फोटो, व्हिडीओ कार्टून रूपात पाहण्याचा जणू काही ट्रेंडच सुरू झाला. त्यानंतर लहान मुले, तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच या ट्रेंडला फॉलो करताना दिसले. पण, नक्की ही सेवा कोणी सुरू केली? ही सेवा कधीपासून तयार करण्यात आली असेल, असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल ना… तर याचेच उत्तर आज तुम्हाला या बातमीत मिळेल.

@PTI_News च्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये ओपनएआयच्या व्हायरल घिबली फीचरमागील भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ प्रफुल्ल धारिवाल यांनी ‘घिबली स्टुडिओ’च्या यशाबद्दल आपले मत मांडले आहे.

“काही आठवड्यांपूर्वीच आम्ही ChatGPT मध्ये इमेज जनरेशन लाँच केले. हे एक प्रॉडक्ट आहे; जे मी आणि आमच्या लहान टीमने गेल्या वर्षभरात अगदी सुरुवातीला तयार केले होते. आम्हाला माहीत होते की, आम्ही काहीतरी अर्थपूर्ण काम करीत आहोत. पण, आम्हाला मिळालेला प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. फक्त दोन आठवड्यांत १३० दशलक्षांहून अधिक लोकांनी ७०० दशलक्षांहून अधिक फोटो ‘घिबली स्टुडिओ’द्वारे तयार केले. त्यातच भारतात मिळालेला प्रतिसाद विशेषतः आश्चर्यकारक आहे. इमेज जनरेटर लाँच झाल्यापासून भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी बाजारपेठ बनला आहे, असे ओपनएआयमधील भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावान प्रफुल्ल धारीवाल यांनी ‘घिबली’बद्दल सांगितले आहे.

व्हिडीओ नक्की बघा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रफुल्ल धारीवाल पुण्याचे रहिवासी असून, अनेक वर्षांपासून ते आपल्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कामगिरीसाठी ओळखले जातात. ते ओपन AI कंपनीमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. याआधीसुद्धा चॅट जीपीटीचा भाग असणाऱ्या GPT-4o च्या टीमचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले होते.