Gmail चे नवीन फीचर, आता यूजर्स चॅटसह ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करू शकणार

फिचर यावर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते. यानुसार तुमच्या चॅट लिस्टमध्ये उपलब्ध असलेल्या लोकांशी वैयक्तिक ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकता.

Gmail-Call
जीमेलच नवीन फिचर (जनसत्ता फाइल फोटो)

गुगल आता जीमेलमध्ये (Gmail) ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचा पर्याय देणार आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे घोषणा केली आहे की कंपनीने हे अपडेट केवळ अॅड्रॉइड (Android) आणि आईओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी आणले आहे. परंतु तुम्ही या १:१ पर्यंतच्या चॅटमध्ये फक्त ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकता. याच्या मदतीने तुम्ही आता फक्त तुमच्या चॅट लिस्टमध्ये उपलब्ध असलेल्या लोकांशी वैयक्तिक ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकता. इतकंच नाही तर त्यात तुम्हाला चॅट हिस्ट्री आणि कॉल डिटेल्सही पाहता येतील.

कसं वापरायचं हे फिचर?

हे अपडेट यावर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आले होते. गुगल चॅटच्या लिस्टमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला कॉल करायचा आहे त्याचे चॅट तुम्ही ओपन करा, त्यानंतर तुम्हाला सर्वात वरती उजवीकडे ऑडिओ आणि व्हिडीओ आयकॉन दिसेल. कॉल करण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवर टॅप करावे लागेल. ज्यावर तुम्ही तुमच्या व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलवर टॅप करून कॉल करू शकता. जीमेल तुम्हाला स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या निळ्या बॅनरद्वारे चालू असलेल्या कॉलबद्दल सूचित करेल. त्यामध्ये व्यक्तीचे नाव आणि कॉलचा कालावधी असेल.

( हे ही वाचा: Petrol Price Today: IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे जाहीर केले नवीन दर, आजची किंमत तपासा )

मिस्ड कॉलही समजणार

मिस्ड कॉल इंडिकेशन संबंधित लाल रंगाचा फोन किंवा व्हिडीओ आयकॉन दिसेल. नवीन कॉलिंग अनुभव वैयक्तिक गुगल (Google) खाती असलेल्या सर्व वापरकर्त्यांसाठी तसेच Google Workspace, G Suite बेसिक आणि व्यवसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. कॉल करण्यासाठी, कॉलर आणि कॉल स्वीकारणारे दोघेही जीमेलची नवीन वर्जन वापरत असणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या लोकांना वाटते लग्नाची भीती, जीवनसाथी शोधण्यासाठी लागतो जास्त वेळ )

Hangouts सेवा होईल बंद

जीमेलवर कॉलिंग अपडेट अशा वेळी येते जेव्हा कंपनी Hangouts वरून Google Chat वर शिफ्ट होत आहे. ही हालचाल सुरुवातीला Google Workspace साठी होती, परंतु ती हळूहळू नियमित वापरकर्त्यांकडे येत आहे तसेच Hangouts सेवा देखील बंद होणार आहे. यासोबतच आता तुम्ही जीमेल, गुगल चॅटवर कस्टम स्टेटस सेट करू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gmails new feature now allows users to make audio and video calls as well as chat ttg

ताज्या बातम्या