scorecardresearch

Premium

इन्स्टाग्राम रील आता सहज करता येईल डाउनलोड; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

इन्स्टाग्राम अ‍ॅपचे रील व्हिडीओ आता तुम्ही सहज डाउनलोड करू शकणार आहात.

Good news for Instagram users Now the reel will be downloaded with one click Follow these steps
(फोटो सौजन्य : Freepik) इन्स्टाग्राम रील आता सहज करता येईल डाउनलोड; फॉलो करा 'या' स्टेप्स

सोशल मीडिया अ‍ॅप इन्स्टाग्रामवर जेव्हापासून रील फीचर लाँच करण्यात आले तेव्हापासून लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच या रील फीचरचा उपयोग त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी करू लागले. या संधीचे सोने करीत बरेच जण प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचले. विविध विषय कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर सगळ्यांसमोर रील व्हिडीओद्वारे मांडतात, काही महिला रेसिपीचे व्हिडीओ बनवतात; तर लहान मुले अभिनय किंवा डान्स करीत आपले कौशल्य दाखवताना दिसतात. बऱ्याचदा हे रील व्हिडीओ आपल्यातील अनेकांच्या पसंतीस उतरतात म्हणून ते आपण स्टेट्स किंवा स्टोरीवर शेअर करतो. आता इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या पब्लिक अकाउंट असलेल्या युजर्सचे रील व्हिडीओ तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. या खास फीचरची अगदी सगळेच इन्स्टाग्राम युजर वाट पाहत होते आणि या फीचरची अनेक वापरकर्त्यांकडून मागणीही केली जात होती. यूएस आणि इतर विविध देशांमध्ये टिकटॉकसाठी (TikTOK) या फीचरचा उपयोग करण्यात येतो आणि या फीचरची लोकप्रियता पाहून हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे फीचर यूएस या देशात उपलब्ध होते; जे आता जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Truecaller introduces AI Powered Call Recording feature in India to record transcribe and summarize their calls
आता Truecaller मध्ये करा कॉल रेकॉर्ड; ‘या’ युजर्सना मिळेल फायदा; फक्त या स्टेप्स करा फॉलो
Zomato delivery boy dances Uljha Jiya song
Video : ”उलझा जिया!” झोमॅटो डिलिव्हरी बॉयने केला भररस्त्यावर डान्स, नेटकरी मिश्कीलपणे म्हणाले, “माझी ऑर्डर…”
cards
रिझर्व्ह बँकेने कार्ड नेटवर्कवर निर्बंध का घातले? तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर…
job opportunities
नोकरीची संधी

रील डाउनलोड फीचरची घोषणा :

इस्टाग्राम अ‍ॅपचे सीईओ अ‍ॅडम मोसेरी यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवरून या खास फीचरची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, हे फीचर जागतिक स्तरावर वापरकर्त्यांसाठी योग्य आहे. इन्स्टाग्राम युजर्स पब्लिक अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेले रील तयार कॅमेरा रोलमध्ये (camera Roll) सेव्ह करू शकता. पण, तुम्ही डाउनलोड केलेल्या कोणत्याही रीलमध्ये क्रिएटर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे नाव म्हणजेच वॉटरमार्क असेल. २०२३ या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर यूएसमध्ये उपलब्ध केले आणि आता ते जागतिक स्तरावरही उपलब्ध होईल, असे सीईओ मोसेरी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…आता तुमच्या मोबाईलमधील सिम कार्डची जागा घेणार ई-सिम ! जाणून घ्या फायदे…

इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी रील डाउनलोड करायचे आहे की नाही हा सर्वस्वी पब्लिक अकाउंटवरील युजर्सचा हक्क असणार आहे. तसेच इन्स्टाग्राम युजर्स जर तुम्हाला एखादे रील आवडले असेल आणि ते डाउनलोड होत नसेल, तर तुम्ही रील व्हिडीओवरील तीन ठिपक्यांवर (three dots) क्लिक करा आणि नंतर पाहण्यासाठी ते नेहमीप्रमाणे सेव्ह करून घ्या. तसेच या फीचरची खास गोष्ट अशी की, तरुण मंडळींनी पोस्ट केलेल्या रील १८ वर्षांखालील कोणतेही युजर्स डाउनलोड करू शकणार नाहीत. तसेच हे रील डाउनलोड फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

रील डाउनलोडच्या स्टेप्स :

पब्लिक अकाउंटवरील रील डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम अ‍ॅपला त्यांच्या फोनच्या स्टोरेजचे अ‍ॅक्सेस देणे शक्य आहे. त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या आवडीचे रील निवडू शकतात आणि नंतर पेपर प्लेन आयकॉनवर टॅप करू शकतात. सगळ्यात खाली तुम्हाला रील डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. रीलवरील शेअर चिन्हावर फक्त टॅप करा आणि डाउनलोड हा पर्याय निवडा. डाउनलोड केलेल्या रीलमध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या लोगोसह पब्लिक अकाउंटवरील युजर्सच्या अकाउंटचे नाव असणारा वॉटरमार्क त्यावर तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही रील डाउनलोड फीचरचा उपयोग करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good news for instagram users now the reel will be downloaded with one click follow these steps asp

First published on: 24-11-2023 at 13:21 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×