गुगल ही नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी काम करत असते. तसेच, आपल्या उत्पादनांमुळे युजरला गैरसोय होऊ नये, यासाठी देखील ती प्रयत्नशील असते. त्यामुळे युजरला देखील गुगलच्या सेवा वापरणे आवडते. यावेळी गुगलने तिचे लेन्स इमेज सर्च फीचर आपल्या होमपेजवर उपलब्ध केले आहे. सर्चबारमध्ये हे फीचर तुम्हाला दिसून येईल.

९टू५ गुगलनुसार, गुगल लेन्सद्वारे युजर कुठलेही छायाचित्र शोधू शकतात. यासाठी त्यांना गुगल सर्चबारवरील व्हॉइस बटनच्या शेजारी अससेल्या बटनवर क्लिक करून त्यामध्ये छायचित्र अपलोड किंवा ड्रॅग करावे लागेल, किंवा यूआरएल पेस्ट करावे लागले.

(३० तासांचा प्लेबॅक टाईम, ४० मिनिटांत फूल चार्ज होतो ‘हा’ नेकबँड, किंमत केवळ ५९९ रुपये)

काय करते गुगल लेन्स इमेज?

गुगल लेन्स इमेज फीचर युजरला सारखे दिसणारे छायाचित्र शोधण्यात मदत करते. इतकेच नव्हे तर ते छायाचित्रात नेमके काय आहे, याबाबत माहिती देते. युजरने एखाद्या उत्पादनाचे छायाचित्र टाकले तर त्याला त्या उत्पादन खरेदीबाबत माहिती मिळेल. वनस्पती किंवा प्राण्यांचे छायाचित्र अपलोड केल्यास त्या प्राण्याची ओळख पटवण्यासाठी हे फीचर तसे अनेक छायाचित्र दाखवते. या छायाचित्रांचा वापर युजर ओळख पटवण्यासाठी करू शकतो.

(आता व्हॉट्सअ‍ॅपवरच मिळणार पॅन, ड्रायव्हिंग लासन्ससह इतर कागदपत्रे, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुगलचे होमपेज नेहमी बदलत नाही. झालेला बदल ही मोठी बाब असल्याची प्रतिक्रिया गुगल अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष राजन पटेल यांनी दिली. गुगल लेन्स केवळ छायाचित्रच सर्च करत नाही तर ते छायाचित्रातील मजकूर देखील कॉपी करते. तसेच ते ट्रान्सलेट देखील करते. छायाचित्राचा मूळ स्त्रोत शोधण्यासाठी हे फीचर मदत करते.