लोकांना त्यांच्या योग्य स्थळी पोहोचण्याचा मार्ग दाखविण्याचे काम करणारे गूगल मॅप्स हे त्यांच्या नवनवीन फीचरसाठी, तसेच अपडेट्ससाठीदेखील प्रसिद्ध आहे. वापरकर्त्यांचा अॅप वापरण्याचा अनुभव अधिक सोईचा व्हावा यासाठी गूगल मॅप्स नेहमीच कार्यरत असते. त्यातच या अॅपने वापरकर्त्यांचा उन्हाळी प्रवास सोईचा व्हावा यासाठी मॅप्सच्या डिझाईनमध्ये तीन खास बदल केले आहेत. ते नेमके कोणते आहेत आणि त्यांचा काय उपयोग होईल ते पाहू.

गूगल मॅप्सचे अपडेटेड डिझाईन [Google Updates Maps’ Design]

मॅप्स पाहणे सोईचे व्हावे यासाठी नवीन डिझाईनमध्ये होमपेजवर मोजके टॅब्स असून, पिनचा रंग बदलण्यात आला आहे. यूएस आणि कॅनडामधील काही ठिकाणांवर गूगल मॅप्सने आता स्थानिक आणि व्यावसायिकांनी निवड केलेल्या रेस्टॉरंट्सची शिफारस केली आहे. तुम्ही तुमच्या इच्छुक स्थळी पोहोचल्यानंतर स्क्रीनवरील गूगल मॅप्समध्ये वर स्वाइप केल्यानंतर विश्वसनीय स्रोतांकडून शिफारस केल्या गेलेल्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सची यादी तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा : AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…

दर आठवड्याला ही ट्रेंडिंग लिस्ट अपडेट होत राहते. हे अपडेट नकाशावरील जागांची एकंदरीत लोकप्रियता लक्षात घेऊन केले जाते. तसेच लोकांना माहीत नसलेल्या ठिकाणांना म्हणजेच हिडन जेम्सनादेखील या यादीमध्ये विशेष स्थान दिले जाते.

गूगल मॅप्स वापरकर्ते त्यांच्या आवडत्या जागांची एक लिस्ट बनवू शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांना सहलींचे नियोजन करणेही सोईचे होते. त्यासाठी मॅप्समध्ये न्यू लिस्ट या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या आवडत्या जागा त्यामध्ये अॅड करून, तुम्ही स्वतःसाठी एक लिस्ट बनवू शकता. इतकेच नाही तर वापरकर्ते सोशल मीडियावरील लिंक मॅप्सवर टाकून, त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेऊ शकतात. तसेच आयएसओ आणि अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनवर ट्रिप प्लॅनिंग आणि शेअरिंगच्या पर्यायांचा जागतिक अपग्रेड गूगल मॅप्स देणार असल्याचे ट्रॅक डॉट इनच्या माहितीवरून समजते.

गूगल मॅप्सदेखील वापरणार AI [Google Maps To Use AI]

गूगल मॅप्स आता प्रतिक्रिया स्कॅन करण्यासाठी फोटो आणि ठिकाणांची वैशिष्ट्ये हायलाईट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा वापर करणार आहे. त्याद्वारे वापरकर्त्यांना इच्छुक स्थळी पोहोचण्याआधीच त्या जागेबद्दल थोडक्यात माहिती देण्यास मदत केली जाते. AI फोटोमधील अन्नपदार्थ ओळखण्यास सक्षम असून, वापरकर्त्यांना त्याबद्दल उपयुक्त माहिती दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ- त्या पदार्थाचे नाव, किंमत, लोकप्रियता, पोषण मूल्ये इत्यादी. अशा विशेष माहितीमुळे एखाद्या लोकप्रिय हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी त्या ठिकाणी रिझर्वेशनची आवश्यकता असते की नाही हे वापरकर्त्यांना समजण्यास मदत होते.

हेही वाचा : एखादे हॉटेल, बाग, दुकान आवडले आहे? मग गूगल मॅप्सच्या ‘या’ फीचरचा वापर करून ‘लोकेशन सेव्ह’ करा…

अशा सर्व उपयुक्त अपडेट्समुळेच गूगल मॅप्स हे आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत कार्यरत असते हे दिसून येते. आता AI च्या मदतीने आणि वापरकर्त्यांनी तयार केलेल्या माहितीच्या मदतीने गूगल मॅप्स प्रवासाच्या दृष्टीने आणि नेव्हिगेशनचे एक उत्तम साधन म्हणून अधिक विकसित होत आहे.