अलीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू आहे. ट्विटरने जवळपास ५० टक्के कर्मचारी कामावरून काढून टाकले आहेत, तर फेसबुकनेही जवळपास ११ हजार लोकांना बेरोजगार केले आहे. आता गुगलही कर्मचारी कपात करणार असल्याचे एका अहवालातून सांगण्यात आले आहे.

अहवालानुसार गुगलची कंपनी अल्फाबेट जगातील आपल्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. संघ व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करण्याचे सांगितले गेले आहे. जे खराब कामगिरी करत आहेत त्यांना कामावरून काढले जाणार आहे.

६ टक्के म्हणजे जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याची योजना आहे. गेल्या तिमाहीत गुगलमध्ये भरतीत मोठी वाढ दिसून आली होती. महामारीदरम्यान कंपनीला झालेल्या वृद्धीने हा प्रकार घडला असावा.

(संगणक, लॅपटॉपची गती कमी झाली? डिलीट करा ‘हा’ डेटा, कार्यक्षमता वाढण्यास होईल मदत)

म्हणून कपातीचा निर्णय

हेज फंडचे मॅनेजर क्रिस्टोफर होन यांनी अलीकडेच भरतीबाबत काही बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. गुगलच्या कर्मचाऱ्यांना उद्योगाच्या नियमांच्या तुलनेत अधिक वेतन दिले जाते. त्याचबरोबर, वास्तविक गरजेपेक्षा भरती अधिक झाली असावी, असे मत क्रिस्टोफर यांनी व्यक्त केले आहे.

तज्ज्ञांनी दिला होत सल्ला

गुगलने २०१७ पासून दरवर्षी कर्मचाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढवली असल्याचे म्हटल्या जाते. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कपात करण्यात यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीतील ६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाऊ शकते. हा आकडा अपेक्षित आकड्यापेक्षाही मोठा आहे. पूर्वी केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाऊ शकते, असे समजले होते.

(५७ हजारांत घरी आणा नवीन IPHONE 14, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्फाबेट ही तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील सर्वात मोठी नियोक्ता आहे. कंपनीत १ लाख ८७ हजार कर्मचारी काम करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला २७ टक्के कमी नफा मिळाला आहे. नोकरकपातीमागे हे एक कारण असू शकते.