सप्टेंबर महिन्यात अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले. त्यात महत्वाचे आकर्षण होते ते म्हणजे आयफोन १५ सिरीजचे. १२ सप्टेंबरला आयफोन १५ सिरीज लॉन्च झाली. त्यात आयफोन १५ , आयफोन १५ प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आता ऑक्टोबर महिन्यात देखील अनेक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत. जर का तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या बातमीतील फोन्सची यादी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ऑक्टोबर महिन्यात गुगल, सॅमसंग आणि वनप्लस व विवो यांसारख्या मोठ्या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन सादर करणार आहेत. या महिन्यात कोणकोणते फोन लॉन्च होणार आहेत ते जाणून घेऊयात.

गुगल पिक्सेल ८ सिरीज

४ ऑक्टोबर रोजी गुगल आपली नवीन सिरीज गुगल पिक्सेल ८ सिरीज लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो या दोन मॉडेल्सची घोषणा होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन्समध्ये नवीन AI सपोर्ट असणारे सॉफ्टवेअर देण्यात येऊ शकते. ज्यामध्ये चेहरा एडिट करणे आणि व्हिडीओ बूस्ट टेक्नॉलॉजीचा समावेश असेल. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: सॅमसंगसह ‘या’ कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिस्काउंट ऑफर्स, एकदा बघाच

वनप्लस ओपन

वनप्लस एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. अशी शक्यता होती की ऑगस्ट महिन्यात वनप्लस आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोनची घोषणा करेल. मात्र काही कारणांमुळे या घोषणेला उशीर झाला. आता कंपनी वनप्लस ओपन या नावाने आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. हा फोन ओप्पो Find N2 वर आधारित असू शकतो आणि यात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन Gen 2 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो.

वनप्लस 11R (रेड)

वनप्लस ७ हा लाल रंगात लॉन्च होणार कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन होता. कंपनीने वनप्लस ११ R या फोनला लाल रंगामध्ये लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. या स्मार्टफोनमध्ये १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. यात गोलाकार आकाराचा रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OxygenOS 13 स्किनसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2023: अवघ्या ४० हजारांत खरेदी करा ‘हा’ iPhone

सॅमसंग Galaxy S23 FE

सॅमसंग कंपनीने गॅलॅक्सी 23 FE च्या लॉन्चिंगची तयारी सुरु केली आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. निवडक बाजारपेठांमध्ये या फोनला Exynos 2200 किंवा स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoC प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो. यामध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग फिचर देखील वापरकर्त्यांना मिळू शकते. तसेच यात ६.२ इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट असलेला FHD + कॉम्पॅक्ट डिस्प्ले मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवो V29 series

विवो ४ तारखेला आपली V29 सिरीजमधील स्मार्टफोनची घोषणा करणार आहे. अधिकृत वेबसाइटनुसार V29 या सिरीजमध्ये एक कर्व्ह डिस्प्ले असेल आणि २x टेलीफोटो लेन्सचा देखील समावेश असेल. हा फोन मॅजेस्टिक रेड या रंगासह अनेक रंगात उपलब्ध केला जाणार आहे.