विविध भाषांचे अर्थ कळावे यासाठी ‘गुगल ट्रान्सलेट’ हे खूप फायदेशीर ठरते. शब्दांचे अर्थ मिळवण्यासाठी पण लोक त्याचा वापर करतात. त्याचा उपयोग सर्वत्र होतो आणि ते फायदेशीर देखील आहे. मात्र, एका देशाला आता ही सेवा उपभोगता येणार नाही. जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्च इंजिन सेवा देणाऱ्या गुगलने चीनमध्ये गुगल ट्रान्सलेशनची सेवा बंद केली आहे.

यामुळे सेवा बंद

गुगलने केवळ ट्रान्सलेशनच नव्हे, तर यापूर्वी आपल्या वस्तूंचे उत्पादन चीनमधून इतर देशांमध्ये हलवले आहे. त्यानंतर चीनमध्ये गुगल ट्रान्सलेट सेवा बंद करणे हा गुगलचा मोठा निर्णय असल्याचे समोर आले आहे. माध्यमांतील अहवालांनुसार, चीनमध्ये ट्रान्सलेशन सेवेचा कमी वापर होत असल्याने ही सेवा या देशात बंद करण्यात आली आहे.

(१०८ एमपी कॅमेरा आणि गतिमान प्रोसेसरसह लाँच झाला Moto G 72, पण ‘हा’ महत्वाचा फीचर नाही)

संकेतस्थळ उघडल्यावर केवळ..

चीनमध्ये ट्रान्सलेशन संकेतस्थळ उघडल्यानंतर आता केवळ एक ‘सर्च बार’ आणि ‘लिंक’ दिसून येते, जी हाँगकाँगमधील कंपनीच्या वेबपेजवर घेऊन जाते. मात्र या वेबपेजवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील अनेक वापरकर्त्यांनी शनिवारपासूनच सोशल मीडियावरून गुगल ट्रान्सलेट सेवा वापरता येत नसल्याची माहिती दिली होती. गुगलच्या क्रोम ब्राऊजरवरील भाषांतराचा फीचर काम करत नाही, असे देखील वापरकर्त्यांनी सांगितले.

ही मोठी सेवाही बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुगलने एका निवेदनातून याबाबत माहिती दिली. मात्र चीनमध्ये किती लोक गुगल ट्रान्सलेट सेवा वापरत होते, याची माहिती गुगले सांगितलेली नाही. गुगलने २०१७ मध्ये चीनमध्ये ट्रान्सलेशन अ‍ॅप लाँच केले होते. केवळ ट्रान्सलेट सेवाच नव्हे, तर गुगलने सरकारच्या सक्तीच्या सेन्सरशीप धोरणामुळे २०१० मध्ये गुगल सर्च इंजिनची सेवा देखील बंद केली होती. गुगलची ‘गुगल मॅप’ आणि ‘मेल’ ही सेवा चीन सरकारने बंद केली आहे.