गुगलने आपली क्लाउड-बेस्ड गेमिंग सेवा Stadia (gaming service Stadia) जानेवारी २०२३ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Stadia ही Google ची क्लाउड व्हिडीओ गेमिंग सेवा आहे जी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. गुगलने आपल्या एका ब्लॉगमध्ये Stadia बंद झाल्याची माहिती दिली आहे.

Stadia बंद होण्याचे कारण

गुगलचे उपाध्यक्ष फिल हॅरिसन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, “वापरकर्त्यांना Stadia आमच्या अपेक्षेप्रमाणे आवडले नाही. यामुळे आम्ही आमची Stadia स्ट्रीमिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खरेदी केलेल्या हार्डवेअर आणि गेम सामग्रीची रक्कम परत करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पुढील वर्षी १८ जानेवारीपर्यंत वापरकर्त्यांना ही सेवा उपलब्ध असेल.

आणखी वाचा : आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

Xbox ची मूळ कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या Stadia सारखी गेम पास सेवा देत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना शेकडो गेम देखील मिळतात. मायक्रोसॉफ्टच्या गेम पासचे २५ दशलक्ष सदस्य आहेत, तर गुगलच्या स्टॅडियाचे एक दशलक्षपेक्षा कमी सदस्य आहेत. Stadia द्वारे, लोक कन्सोल सारख्या ईमेलवर गेम खेळू शकतात.

काही दिवसांपूर्वीच सॅमसंगच्या टीव्हीसोबत मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स गेम सपोर्ट मिळाला आहे. Amazon ने या वर्षाच्या सुरुवातीला लुना व्हिडीओ गेम नावाची स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू केली, जी सध्या फक्त यूएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, जरी लवकरच ती इतर देशांमध्ये रिलीज करण्याची योजना आहे.