सध्या जगभरामध्ये कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कर्मचारी कपात करण्यामागे आर्थिक मंदी हे कारण या कंपन्यांकडून दिले जात आहे. त्यातच सर्च इंजिन असणाऱ्या Google ने देखील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. मात्र नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

प्रसूती आणि वैद्यकीय रजेवर असताना काढून टाकलेल्या माजी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उरलेल्या उर्वरित कालावधीसाठी पैसे दिले जाणार नाहीत असे गुगल कथितपणे सांगत आहे. या बातमीमुळे १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी “Laid off on Leave” नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. याबाबतचे वृत्त CNBC ने दिले आहे.

हेही वाचा : Google च्या २५० कर्मचाऱ्यांनी ‘या’ कारणासाठी केले ‘वॉकआऊट’

कर्मचारी कपातीदरम्यान रजेवर असलेल्या लोकांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. यामध्ये टर्निटी लीव्ह, बेबी बाँडिंग लीव्ह, केअरगिव्हर लीव्ह, मेडिकल लीव्ह आणि पर्सनल लीव्हवर असलेल्या Google कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या लोकांनी एकत्र येऊन आधीच मंजूर केलेल्या आठवडे आणि महिन्यांच्या रजेचे पैसे देण्याची मागणी केली आहे.

बडतर्फ कर्मचार्‍यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई आणि मुख्य लोक अधिकारी (सीपीओ) फिओना सिचिओनी यांच्यासह कंपनीच्या अधिकार्‍यांना तीन वेगवेगळ्या प्रसंगी पत्रे पाठवली आहेत. ९ मार्च रोजी ही पत्रे पाठवण्यात आली असून यावर गुगलने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

हेही वाचा : Twitter यूजर्ससाठी मोठा धक्का! आजपासून बंद होणार ‘हे’ जबरदस्त सिक्युरिटी फिचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गुगलच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी कर्मचारी कपात चांगल्या प्रकारे हाताळण्याची मागणी केली आहे. या पत्रावर १,४०० हून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. या पत्राद्वारे या लोकांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या निर्णयाचा संपूर्ण जगभरात परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.