How e commerce companies like Amazon Flipcart give discounts up to 80 90 percent know how they earn profit through this | ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या | Loksatta

ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

फ्लिपकार्ट व अमेझॉनच्या फेस्टिव्ह सीजन सेलची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सेलमधील मोठमोठ्या ऑफर्समधून कंपनीला कसा नफा मिळतो जाणून घ्या.

ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या
(प्रातिनिधिक फोटो)

सध्या सर्वत्र ऑनलाईन फेस्टिव्ह सीजन सेलची चर्चा सुरू आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही त्यामधील सर्वात लोकप्रिय इ कॉमर्स कंपन्या आहेत. यांसह काही इतर कंपन्यांनीही सेलच्या या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. परंतु ग्राहकांची सर्वात जास्त पसंती फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरील या सेलच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. यामध्ये अनेक प्रोडक्ट वर ७० ते ८० टक्के सूट आहे. ही ऑफर वाचून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की या कंपन्यांना इतकी मोठी सूट देणे कसे परवडते?

अमेझॉनकडून इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर ७५ टक्के तर फ्लिपकार्टकडून ८० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. हा डिस्काउंट कसा दिला जातो आणि कंपनीला यातून नफा मिळतो का? नफा कामावण्याचे कंपनीचे नेमके गुपित काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याबद्दल जाणून घेऊया.

आणखी वाचा : जिओ, वोडाफोन व एअरटेलचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत? पाहा यादी

तोट्यापासून सुरुवात
ऑनलाइन प्लॅटफॉर्म आज भरपुर नफा कमवत आहेत, परंतु त्यांची सुरुवात तोट्याने झाली होती. सुरुवातीला ऑनलाइन खरेदीचे आमिष दाखवून त्यांना ऑनलाईन खरेदीची ग्राहकांना सवय लावायची होती. त्यामुळे या कंपन्यांनी सुरूवातीला तोटा सहन केला आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. काही वर्षांपुर्वी बहुतेक जण ऑनलाइन खरेदी करणे टाळत असत, परंतु आज वेळ अशी आहे की सर्वत्र ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जाते.

विक्री वाढवण्यासाठी नफा कमी केला जातो
नफा कमवण्याचे दोन मार्ग आहेत, पहिला म्हणजे तुम्ही महागड्या किंमतीत वस्तू विकुन कमी ग्राहक आल्यावरही नफा मिळवणे आणि दुसरा मार्ग म्हणजे प्रति ग्राहक मिळणारा नफा कमी करून वस्तू स्वस्तात विकणे. पहिल्या मार्गाने नफा कमावण्यासाठी एका मर्यादेपेक्षा एखादी वस्तु जास्त महाग विकण्यात अडचण जाणवते. परंतु दुसऱ्या मार्गाने दर कमी करून, तुम्ही मोठ्या संख्येने ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता.

OTT Free Subscription : असे मिळवा नेटफ्लिक्स व अ‍ॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन

सेलच्या दिवसांमध्ये इ कॉमर्स कंपन्यांकडुन दुसरा पर्याय वापरला जातो. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, ज्याची सुरुवात होण्याआधी हे सेल सुरू होतात. या सेलच्या कालावधीत कंपन्यांचा पूर्ण भर जास्तीत जास्त विक्री करण्यावर असतो. दरम्यान सूट देऊन नफा कमी केला जातो. पण एकूणच बघितले तर ही विक्री इतकी मोठी आहे की या दिवसात वर्षभराची कमाई होते. ग्राहकांना सवलत देण्यात प्लॅटफॉर्म आणि विक्रेते दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. विक्रीदरम्यान व्हॉल्यूम वाढवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांचे कमिशन कमी करतात, तर विक्रेते त्यांच्या वापरलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सूट देतात. पण ही सवलत मर्यादित संख्येत उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: इंस्टाग्राम नंतर ट्विटरने वापरकर्त्यांना दिली खास लोकांच्या निवडीची सोय; ट्विटर सर्कल कसे वापराल?

संबंधित बातम्या

Bluebugging: ब्लूटूथ सुरू ठेवणे पडू शकते महागात, डेटा होऊ शकतो चोरी
मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:लाच पाठवता येईल मेसेज, तयार करता येईल नोट्स, ‘असे’ वापरा नवीन फीचर
X-Ray ची सुरुवात कशी झाली माहित आहे का? जाणून घ्या सर्वप्रथम शरीराच्या कोणत्या भागाचा एक्स-रे काढण्यात आला
Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
व्हा सावधान! 5G अपग्रेड सारखं तुम्ही ही राहा अपडेट; नाहीतर बँक खाते रिकामे झाल्याचा येईल मेसेज…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुमची लायकी…” ‘शार्क टँक इंडिया २’ मधून वगळल्यानंतर अशनीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया
Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक
“Greatest Off All Time म्हणजेच GOAT”, बकऱ्यावर चढला फुटबॉल फिव्हर, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ‘भावा याला तर FIFA ला पाठवा’
FICA: धक्कादायक! पैसा की देश, फिकाच्या रिपोर्टने क्रिकेटविश्वात उडवली खळबळ
“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!