युट्यूब हे लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तींचा कंटेन्ट, व्हिडीओ सहजरित्या उपलब्ध होतात. तसेच कंटेन्ट क्रियेटर्सना देखील त्यांच्या जगभरातील चाहत्यांपर्यंत पोहोचता येते. पण कधीकधी यामध्ये भाषेची अडचण येऊ शकते. वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या, वेगवेगळ्या भाषेच्या लोकांपर्यंत आपला कंटेन्ट पोहचावा अशी अपेक्षा असणाऱ्या युट्यूबर्ससाठी सबटायटल्स मदत करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही सहज युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स जोडू शकता. जाणून घ्या या सोप्या स्टेप्स.

आणखी वाचा: WhatsApp अवतार फीचर पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या

असे करा युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स अ‍ॅड

युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन तुमच्या चॅनेलमध्ये लॉग इन करा. त्यानंतर अपलोड व्हिडीओ आयकॉनवर क्लिक करून व्हिडीओ अपलोड करायला सुरूवात करा. त्यानंतर व्हिडीओ एलीमेंट्समध्ये तुम्हाला सबटायटल्स अ‍ॅड करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपलोड फाईल, ऑटो सिंक, मॅन्युअली टाईप असे तीन पर्याय दिसतील. हे पर्याय वापरून सबटायटल कसे अ‍ॅड करायचे जाणून घ्या

अपलोड फाईल
अपलोड फाईलमध्ये तुम्हाला सबटायटल थेट अपलोड करण्याचा पर्याय मिळतो. जर तुम्ही सबटायटल नोटपॅडमध्ये लिहले असतील तर तिथून कॉपी करून अपलोड फाईलमध्ये पेस्ट करू शकता. यामध्ये ‘विथ टायमिंग’ हा पर्याय देखील उपलब्ध होतो. म्हणजे जर सबटायटल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या विशिष्ट दृश्यानुसार दिसावे असे वाटत असतील तर हा पर्याय निवडावा. ‘विदाउट टायमिंग’ पर्यायामध्ये सबटायटल आपोआप व्हिडिओमध्ये सिंक केले जातील.

आणखी वाचा- Twitter Blue Tick: ट्विटरवरील ब्लू टिक व्हेरीफीकेशन किती रुपयांमध्ये उपलब्ध होणार? जाणून घ्या नवी किंमत आणि फिचर्स

ऑटो सिंक
या पर्यायामध्ये सब स्टेटस फक्त कॉपी-पेस्ट करायचे असतात ते युट्युबद्वारे व्हिडिओमध्ये ऑटो सिंक केले जातात.

टाईप मॅन्युअली
या पर्यायामध्ये तुम्हाला व्हिडीओनुसार सबटायटल्स टाईप करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

या प्रक्रियेनंतर एकदा सबटायटल व्हिडीओनुसार बरोबर आहेत ना याची खात्री करा. जर काही चुक असेल तर तुम्ही सबटायटल एडिट करू शकता. यानंतर व्हिडीओ अपलोड करा, अशाप्रकारे युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स जोडता येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to add subtitles to youtube video know easy steps pns
First published on: 13-12-2022 at 15:30 IST