ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. ट्विटकडुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ब्लु टिक संदर्भातील नव्या किंमती आणि फिचर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. यामधील माहितीनुसार अँड्रॉइड आणि वेबसाठी ब्लु टिकची किंमत ८ डॉलर असेल, तर आयओएससाठी ११ डॉलर असेल.
पण ट्विटरवर ब्लू टिक कसे मिळवावे याबाबत अनेकांना शंका असते. सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही ट्विटरवर ब्लू टिक मिळवू शकता, कोणत्या आहेत त्या स्टेप्स जाणून घ्या.
आणखी वाचा: WhatsApp अवतार फीचर पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या
ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठीच्या पायऱ्या
- ॲप्लिकेशनच्या प्रोफाइल पेजवर किंवा ‘ट्विटर डॉट कॉम’वर जा
- तिथे ‘ट्विटर ब्लू’ हा पर्याय निवडा.
- ‘ब्लू सब्सक्राईब’ या पर्यायावर क्लिक करा.
- आयओएस वापरकर्त्यांनी ॲप्लिकेशनच्या सूचनांचे पालन करा.
- या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही ब्लू टिक साठी अप्लाय करू शकता.