गिफ्ट्स हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. वाढदिवसानिमित्त, प्रमोशन निमित्त, परदेशी राहायला जाणाऱ्या व्यक्तीला किंवा अगदी रुसवे फुगवे काढायचे असतील तरीही गिफ्ट्स देऊन समोरच्या व्यक्तीला खुश केले जाते. पण प्रत्येकवेळी काय गिफ्ट निवडायचे? आपण निवडलेले गिफ्ट समोरच्या व्यक्तीला आवडेल का? असा प्रश्न पडतो आणि गिफ्ट निवडायचे मोठे टेन्शन येते. हे टेन्शन कमी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने एक पर्याय उपलब्ध केला आहे ज्याचे नाव आहे ‘अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड’.

‘अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड’चा वापर करून आपण डिजिटल गिफ्ट कार्ड्स भेट म्हणून देऊ शकतो, आपण ज्या व्यक्तीला हे पाठवू ते याचा वापर करून अ‍ॅमेझॉनवरून हवी ती गोष्ट विकत घेऊ शकतील. ज्या इतर प्लॅटफॉर्म्सवर ‘अ‍ॅमेझॉन पे’ स्वीकारले जाते तिथे ही या कार्ड्सचा वापर करता येतो. अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड कसे पाठवायचे जाणून घ्या.

आणखी वाचा- SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड पाठवण्याच्या सोप्या स्टेप्स

  • ‘अ‍ॅमेझॉन पे अकाउंट’मध्ये लॉगइन करा.
  • ‘सेंड अ गिफ्ट’ या पर्यायावर क्लिक करा.
  • कोणत्या प्रकारचे गिफ्ट कार्ड पाठवायचे आहे ते निवडा.
  • गिफ्ट कार्ड डिटेल्स रिव्ह्यू करून कंटीन्यू पर्याय निवडा.
  • पेमेंट करा.
  • रिव्ह्यू करून ऑर्डर कन्फर्म करा.

अशाप्रकारे तुम्ही गिफ्ट काय द्यायचे या टेन्शनपासून सुटका मिळवून, समोरच्या व्यक्तीला हवे ते गिफ्ट देऊ शकता. ज्या व्यक्तीला तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवले आहे, त्यांना ते रीडिम कसे करायचे याबाबत ईमेल पाठवला जाईल.