How to transfer eSIM from one iPhone to another iPhone : भारतात iPhone म्हणजे एक स्टेटस सिंबल झाला आहे. त्यामुळे अनेकांकडे आता आयफोन पाहायला मिळतात. नवीन आयफोन वापरण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. iPhone घेतल्यानंतर तुम्ही आधीच्या फोनमधील सर्व डेटा कॉपी करून घेत नवीन iPhone मध्ये तो सेट करतो. पण काहीजण आधीही iPhone वापर असतात त्यानंतर पुन्हा अपडेटेड iPhone घेतात. पण जुन्या आयफोनमधून eSIM नव्या आयफोनमध्ये सेट करताना अडचणी येतात. पण तुम्हाला आधीचा फोन नंबर पाहिजेच असतो, त्यामुळे तुम्ही eSIM ट्रान्सफर कसा करायचा याचा विचार करता, अनेकांना हे कठीण वाटते पण तसे नाही अगदी ४ तासात तुम्ही जुन्या iPhone मधून नवीन iPhone मध्ये eSIM ट्रान्सफर करू शकता. यासाठी खालील काही सोप्प्या टिप्स फॉलो करा.
या स्टेप्स फॉलो करण्यापूर्वी तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आहे का खात्री करा. तसेच जुना आणि नवीन आयफोन ISO 16 किंवा त्यानंतरचा अपडेट केलेला असावा. यानंतर तुम्ही काही मिनिटांत eSIM ट्रान्सफर करु शकता.
iPhone मध्ये eSIM मॅन्युअल पद्धतीने कसे ट्रान्सफर करायचे?
१) सर्वप्रथम iphone च्या Setting> Mobile Data> Mobile service सेटअपवर जा.
२) आता तुम्हाला तुमच्या जुन्या iPhone मध्ये वापरत असलेले सर्व मोबाईल नंबर दाखवले जातील- मग ते ई-सिम असो किंवा फिजिकल.
३) तुमचा टेलिकॉम ऑपरेटर अर्थात सिम ऑटोमॅटिक eSIM ट्रान्सफरला सपोर्ट करत नसल्यास, तुम्हाला तुमच्या नंबरच्या खाली ‘Transfer not supported’ असे लिहिलेले दिसेल. आता तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल आणि एक आवश्यक मेसेज पाठवावा लागले.
उदा. जर तुम्ही Jio e-SIM वापरचा असेल तर तुम्हाला My Jio अॅप डाउनलोड करावा लागेल, ज्यात तुमचा ईमेल आयडी टाकून 199 वर GETESIM हा एक मेसेज सेंट करावा लागेल. एअरटेल नंबर असेल तर तुम्हाला 121 वर eSIM आणि Vodafone Idea साठी 199 वर eSIM हा मेसेज पाठवावा लागेल.
५) वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला eSIM ट्रान्सफर प्रक्रिया सुरु असल्याचे सांगणारा एक ईमेल येईल.
iPhone मध्ये eSIM ऑटोमॅटिकली कसे ट्रान्सफर करायचे?
जुन्या iPhone मधून नव्या iPhone मध्ये eSIM ट्रान्सफर करण्याचे आणखी दोन पर्याय आहेत. यातील पहिला म्हणजे ‘transfer from nearby iPhone’ आणि दुसरा ‘QR code’
१) यासाठी सर्वप्रथम Settings > Mobile Data > Set up mobile service वर जा. तुमच्या स्क्रीनच्या खाली ‘Other options’ दिसेल त्यावर टॅप करा. यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील – पहिला ‘transfer from nearby iPhone’ आणि दुसरा ‘QR code’
२) यातील तुम्ही ‘transfer from nearby iPhone’ पर्याय निवडल्यास, तुम्हाला तुमच्या जुन्या आयफोनवर एक नोटिफिकेशन येईल. आता continue टॅप करा आणि तुम्हाला तुमच्या नवीन iPhone वर मिळालेला verification code एंटर करा. या प्रोसेसनंतर तुमचे eSIM ट्रान्सफर केले जाईल.
३) तुम्ही QR Code ऑप्शन निवडल्यास, तुम्हाला तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करावा लागेल आणि त्यांना QR Code विचारावा लागेल. यानंतर कॅमेरा अॅप वापरून कोड स्कॅन करून जेव्हा सेल्युलर प्लॅन डिटेक्टेड नोटिफिकेशन दिसेल तेव्हा त्यावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनच्या खाली Continue वर टॅप करावे लागेल आणि तुमचा data plan जोडावा लागेल.
बस एवढेच! तुमच्या जुन्या iPhone वरून तुमच्या नवीन iPhone वर तुमचे eSIM ट्रान्सफर करण्याच्या या सोप्प्या स्टेस्प आहेत. पण लक्षात ठेवा तुमचा टेलिफोनऑपरेटर कोणत्या प्रकारचे eSIM ट्रान्सफर सपोर्ट देतो यावर या स्टेप्स अवलंबून आहेत.