Apple’s iPhone 15 Pro Max: अ‍ॅप्पल कंपनीचा नवा आयफोन पुढील काही महिन्यांमध्ये बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे. या नव्या उत्पादनाबद्दल यूजर्समध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. iPhone 15 च्या सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये यूएसबी-सी पोर्ट, डायनमिक आयलॅंड, A17 बायॉनिक चिपसेट आणि अन्य काही अत्याधुनिक फीचर्स असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सीरिजमधील iPhone 15 Pro Max बाबत लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. हा आयफोन सर्वात पातळ बेझल असण्याचा Xiaomi कंपनीच्या Xiaomi 13 या स्मार्टफोनचा विक्रम मोडणार आहे असे म्हटले जात आहे. Xiaomi 13 मध्ये 1.81 mm डिस्प्ले बेझल लावण्यात आले होते. तर iPhone 15 Pro Max मध्ये डिस्प्ले बेझलचा आकार 1.55 mm इतका असू शकतो. आइस यूनिव्हर्सिटी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप्पलच्या नव्या आयफोनमध्ये सर्वात पातळ बेझल असण्याबरोबर टायटॅनियम मिश्र धातुच्या मध्यम फ्रेमचाही समावेश करण्यात आला आहे.

Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year IPL What is other rule changes
एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर! आयपीएलमध्ये यंदा तुफानी फटकेबाजीला ब्रेक लागेल?
nashik, Manmad, Severe Water Shortage, Wagdardi Dam, Near Depleting, water storage,
वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे
water crises banglore
गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?
knee pain
गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार

नव्या चॅटबॉटमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात? या ‘२०’ क्षेत्रांमध्ये AI घेऊ शकतो माणसांची जागा

टायटॅनियम फ्रेम, बायॉनिक चिप्स, सॉलिड स्टेट बटण अशा काही फीचर्समुळे iPhone 15 Pro Max ची किंमत वाढू शकते. त्यात अमेरिकेमधील वाढत्या महागाईचा परिणामही या आयफोनच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. परिणामी हा अ‍ॅप्पल कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला सर्वात महागडा आयफोन बनणार आहे. iPhone 15 ही सीरिज सप्टेंबर २०२३ पर्यंत लॉन्च होऊ शकते. भारतीय बाजारपेठेमध्ये हे आयफोन्स कधी पर्यंत येणार आहेत याबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहक व्यवहार मंत्रालयाने लॉन्च केला नवा AI chatbot; ग्राहकांच्या सोयीसाठी घेतली जाणार तंत्रज्ञानाची मदत

बेझल म्हणजे काय?

आयफोनच्या स्क्रीनजवळ असलेल्या भागाला ‘बेझल’ (Bezel) असे म्हटले जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आयफोनची स्क्रीन आणि त्याची फ्रेम यांच्यामधील जागा म्हणजे बेझल. स्क्रीन खराब होऊ नये यासाठी या भागाची मदत होते. तसेच यामुळे फोनला क्लासी लूक देखील येतो.