गेल्या वर्षी ओपनएआयने अपोलो ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. तसे इतर अनेक कंपन्यांनी देखील आपापले AI लॉन्च केले आहेत. तर काही कंपन्या त्यावर अजून काम करत आहेत. मात्र आजच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये AI सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलमुळे नोकऱ्यांना धोका वाढू लागला आहे. AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम होणार का अशी चिंता सर्वाना वाटत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. तर ती बातमी काय आहे आणि त्याचा नोकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

IBM म्हणजेच इंटरनॅशनल बिजनेस मशिन्स सारखी मोठी कंपनी देखील आता माणसांऐवजी AI ला नोकऱ्या देण्याची तयारी करत आहे. IBM कंपनी येत्या काळामध्ये ७,८०० नोकऱ्यांना AI द्वारे बदलले जाऊ शकते. म्हणजेच AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आता खरी वाटू लागली आहे.

हेही वाचा : Motorola ने लॉन्च केले ‘हे’ दोन तगडे स्मार्टफोन; ५००० mAh ची बॅटरी, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह मिळणार…

IBM चे सीईओ अरविंद कृष्णा म्हणाले, ”IBM ला अपेक्षा आहे की येत्या काही वर्षांमध्ये सुमारे ७,८०० नोकऱ्यांना AI द्वारे बदलले जाऊ शकते.” अरविंद कृष्णा यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. त्यांनी नमूद केले की, IBM मध्ये बॅक ऑफिसच्या कामात भरती कमी झाली आहे. तसेच काही विभागात नोकरभरती बंद करण्यात आली आहे.

AI ChatGpt चॅटबॉट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेले माध्यम आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. OpenAI ने अलीकडेच ChatGpt – 4 लॉन्च केले आहे. जे आधीच्या चॅटबॉटपेक्षा अधिक प्रगत असल्याचा दावा केला जात आहे. 

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टनंतर आता IBM कंपनी करणार नोकरकपात; ३९०० कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात

सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत तसेच कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात ही कपात सुरूच आहे. यामध्ये Google, Microsoft, ShareChat, Amazon , Meta यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. IBM कंपनीने देखील आपल्या ३९०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.