Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. अनेकांची इच्छा असते की आपण या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरावेत. iPhone 15 सिरीज १२ सप्टेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. या सीरिजच्या लॉन्चिंगनंतर टेक जायंट आयफोन १२ सिरीज कंपनी बंद करणार आहे. आयफोन १२ अजूनही शक्तिशाली आयफोन आहे. जर का तुम्हाला एक माध्यम श्रेणीचा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला आयफोन १२ हा फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डेज सेलमध्ये स्वस्तात खरेदी करता येणार आहे. तर हा फोन खरेदी करताना फ्लिपकार्टवर कोणकोणत्या ऑफर्स आहेत ते पाहुयात.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्स डेजमध्ये आयफोन १२ फक्त २,७४९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्यासाठी काही आठवडे शिल्लक आहेत. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या चार मॉडेल्सचा समावेश असेल. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : आता WhatsApp वर करता येणार ग्रुपमध्ये ऑनलाइन शॉपिंग, लॉन्च झाले ‘हे’ खास फिचर

आयफोन १२ सिरीज कंपनी पुढील महिन्यात बंद करेल. आयफोन १२ सध्या जगभरात विकल्या जाणाऱ्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक आहे. आयफोन १२ कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर ५९,९०० रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. तथापि कंपनी फ्लॅगशिप फ्लिपकार्टवर ५६,९९९ रूपयांमध्ये किरकोळ विक्री करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरेदीदार ICICI बँकेच्या खरेदी कार्डवर EMI व्यवहारांवर १,२५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो ज्यामुळे आयफोन १२ ची किंमत कमी होऊन ५५,७४९ रूपये इतकी होईल. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोच्या बदल्यात ५३,००० हजारांचा डिस्काउंट देत आहे. अनेक बँक ऑफर्स आणि डिस्काउंट ऑफर्ससह तुम्ही फ्लिपकार्टवर ५४,२५० रुपयांचा डिस्काउंटनंतर केवळ २,७४९ रुपयांमध्ये आयफोन १२ खरेदी करू शकता.