scorecardresearch

Premium

iPhone 15 Series Sale In India: १७ तास रांगेत वाट पाहत उभे आहेत ग्राहक; या सिरिजमध्ये एवढे खास आहे तरी काय?

Apple ने १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्निया येथे झालेल्या इव्हेंटमध्ये आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे.

iPhone 15 series sale started today in india
आयफोन १५ सिरीजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. (Express photo by Pradip Das)

Apple ने १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्निया येथे झालेल्या इव्हेंटमध्ये आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे प्री-बुकिंग सुरु झाले होते. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे.आजपासून भारतात आयफोन १५ सिरीजची विक्री सुरू झाली आहे. आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची खरेदी करण्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी मुंबई आणि दिल्लीमधील अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये गर्दी केली आहे.

मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या अ‍ॅपल स्टोअरमध्ये लॉन्च झालेले नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली आहे. ”मी काल दुपारी ३ वाजल्यापासून येथे आलो आहे. भारतातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरमध्ये पहिला नवीन आयफोन घेण्यासाठी मी १७ तास रांगेत प्रतीक्षा केली असे अहमदाबादवरून आलेल्या एका ग्राहकाने ANI ला सांगितले. ” मुंबईतील स्टोअरबाहेर देशभरातील ग्राहक नवीन आयफोन खरेदीसाठी रांगेत उभे आहेत.

passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
Traffic Jam Bengaluru viral video
कार ट्रॅफिकमध्ये अडकली असतानाच लागली भूक, ऑर्डर केला पिझ्झा, थेट कारमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केल्याचा VIDEO व्हायरल
vivo t2 pro launch india with bank offers
VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच
NavIC isro system use in iphone pro and pro max model
आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…

हेही वाचा : iPhone 15 Series Sale In India: भारतात आजपासून विक्रीला सुरूवात; झटपट कॅशबॅकसह मिळणार…, फीचर्स एकदा बघाच

बंगळुरूमधील ग्राहक विवेक यांनी सांगितले की, मी नवीन आयफोन घेणार म्हणून मला आनंद झाला आहे. अहमदाबाद येथील एका ग्राहकाने सांगितले की मी सकाळी ५ वाजल्यापासून स्टोअरच्या बाहेर उभा आहे. तसेच तो पुढे म्हणाला की मी स्टोअरच्या ओपनिंगवेळी देखील आलो होतो आणि मला सीईओ टीम कूक यांना भेटण्याची संधी मिळाली होती.

अशीच गर्दी दिल्लीमधील साकेत येथे असणाऱ्या Apple स्टोअरबाहेर पाहायला मिळाली. आयफोनचे चाहते सकाळपासूनच स्टोअरबाहेर वाट बघत उभे आहेत. ”मी सकाळी ४ वाजल्यापासून रांगेत उभा होतो मग मी फोन खरेदी केला. माझ्याकडे नेहमी टॉप फोन्स असतात. माझ्याकडे आयफोन १३ प्रो मॅक्स आणि आयफोन १४ प्रो मॅक्स आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर मला आयफोन 15 प्रो मॅक्स घ्यायचा होता, तो ही सर्वांच्या आधी.”असे आयफोनच्या एका उत्साही चाहत्याने सांगितले.

काय आहे खास ?

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसमध्ये A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर आयफोन १५ प्रो मॉडेलमध्ये सर्वात शक्तिशाली अशा A17बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अ‍ॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत. कंपनीने आयफोन १५ व १५ प्लस पाठोपाठ आयफोन १५ प्रो सिरीज लॉन्च केली आहे. यामध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे. बेजल देखील कमी करण्यात आले आहे. तुम्ही आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स अनुक्रमे ६.१ आणि ६.७ इंचाच्या डिस्प्लेसह खरेही करू शकता. आयफोन १५ च्या डिस्प्लेचा आकार ६.१ इंच आणि आयफोन १५ प्लस डिस्प्लेचा आकार ६.७ इंच असणार आहे. दोन्ही मॉडेल्सना सिरॅमिक ग्लासचे संरक्षण देण्यात आले आहे.आयफोन १५ ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु होते. आयफोन १५ प्लसची किंमत ८९,९०० रुपये तर आयफोन १५प्रो ची किंमत १,३९,९०० रुपये आणि आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरु होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone 15 series sale started india fans queue outside mumbai and delhi stores check features tmb 01

First published on: 22-09-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×