scorecardresearch

आता मास्क लावला असेल तरी आयफोन होईल अनलॉक, अ‍ॅपलने आणलं नवं फिचर

करोना काळात एक समस्या आयफोन स्मार्टफोनधारकांना वारंवार सतावत होती. फोन अनलॉक करण्यासाठी मास्क खाली घ्यावं लागत होतं.

Iphone_Mask_Unlock
आता मास्क लावला असेल तरी आयफोन होईल अनलॉक, अ‍ॅपलने आणलं नवं फिचर

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाने इतका वेग घेतला आहे की, रोज नवे गॅझेट समोर येत असतात. सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतोच. करोना काळात तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा झाला. लॉकडाउन, आयसोलेशनच्या काळात स्मार्टफोनने मोलाची साथ दिली. असं असताना करोना काळात एक समस्या आयफोन स्मार्टफोनधारकांना वारंवार सतावत होती. फोन अनलॉक करण्यासाठी मास्क खाली घ्यावं लागत होतं. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणं गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क काढणं धोक्याचं ठरू शकतं. मास्क लावून चेहऱ्याने आयफोन अनलॉक करण्यात लोकांना अडचणी येत आहेत. मास्क घातल्याने आयफोन चेहरा ओळखत नाही. त्यामुळे आयफोन अनलॉक करणे कठीण होतं. ही अडचण लक्षात घेत अ‍ॅपलने आयफोनसाठी नवीन आयओएस १४.५ अपडेट जारी केले आहे. अ‍ॅपलने निवेदनात सांगितलं आहे की, युजर्संना मास्क असताना फेस आयडी वापरून त्यांचे आयफोन अनलॉक करण्याची परवानगी देणारे नवीन वैशिष्ट्य केवळ आयओएस १४.५ साठीच आहे. हा अपडेट आयफोन १२, १२ मिनी, १२ प्रो आणि १२ प्रो मॅक्स आणि आयफोन १३, १३ मिनी, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्सवर उपलब्ध आहे.

नवीन अपडेटमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतील. मास्क लावूनही आयफोन अनलॉक करणे हे वैशिष्ट्यांपैकी एक आहे. मात्र, यासाठी कनेक्टेड अ‍ॅपल वॉच असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही मास्क लावूनही तुमचा फोन अनलॉक करू शकता. तुम्ही मास्क लावून अ‍ॅपल वॉचच्या मदतीने ते अनलॉक करू शकता.

असा करा मास्क लावून आयफोन अनलॉक

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये नवीन आयओएस १४.५ अपडेट करावा लागेल.
  • अपडेट करण्यासाठी, तुम्हाला फोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल.
  • सेटिंग्जमधील जनरल सेटिंग्जवर टॅप करा. जनरल सेटिंगमध्ये गेल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट या पर्यायावर क्लिक करा
  • आता अपडेट डाउनलोड करा आणि अपडेट केल्यानंतर अ‍ॅपल वॉच watchOS 7.4 वर चालतंय की नाही ते तपासा.
  • आता दोन्ही उपकरणे नवीनतम सॉफ्टवेअरवर अपडेट केल्यानंतर आयफोनवर सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  • आता FaceID आणि Passcode वर क्लिक करा. येथे तुम्हाला आयफोनचा पासकोड टाकावा लागेल.
  • आता खाली स्क्रोल करा आणि अनलॉक विथ अ‍ॅपल वॉच पर्यायावर क्लिक करा.
  • टॉगल ऑन करा. यानंतर मास्क घालूनही तुम्ही तुमच्या अ‍ॅपल वॉचच्या मदतीने आयफोन अनलॉक करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone update users to unlock their devices while having face masks rmt

ताज्या बातम्या