iQOO ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने नुकताच एक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. iQOO ने आपला iQOO Z7 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन तुम्हाला अत्यंत कमी किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. भारतात लॉन्च झालेला हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या स्मार्टफोनपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे. या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
iQOO Z7 चे फीचर्स
iQOO Z7 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.३८ इंचाचा AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. त्याचा रिफ्रेश रेट हा ९०Hz इतका आहे. तसेच फोनमध्ये तुम्हाला ६ आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. तसेच वापरकर्त्यांना या फोनमध्ये ४५००mAh ची बॅटरी आणि चार्जिंगसाठी ४४W चा रॅपिड सपोर्ट देण्यात आला आहे.
iQOO Z7 ५जी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टीम मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने फिंगरप्रिंट सेन्सरचे फिचर देण्यात आले आहे. फोटो काढण्यासाठी यामध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच (OIS) स्पोर्टचा ६४ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा येतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय आणि जीपीएस फीचर्स देण्यात आले आहेत.
किंमत व ऑफर्स
iQOO Z7 ५जी या स्मार्टफोनची ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही पॅसिफिक नाईट आणि नॉर्वे ब्ल्यू या रंगांमध्ये खरेदी करू शकता. HDFC आणि SBI बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड व EMI व्यवहारांवर तुम्हाला १,५०० रुपयांची सूट मिळत आहे. म्हणजेच हे दोन्ही फोन तुम्ही अनुक्रमे १७,४९९ आणि १८,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. हा फोन तुम्ही Amazon आणि iQOO इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकणार आहात. हा सेल आज (२१ मार्च) पासून दुपारी १ वाजल्यापासून सुरु झाला आहे.