scorecardresearch

गुढीपाडव्या दिवशी iQOO चा 5OMP कॅमेरा असलेला ‘हा’ 5G फोन झाला स्वस्त; पाहा ऑफर डिटेल्स

तुम्ही देखील iQOO चा कोणता फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली ऑफर आहे.

iQOO Z6 5G gets a price cut in India but is it worth buying right now sjr 98
iQOO Z6 5G फोन झाला स्वस्त ( iQOO website)

अखेर iQOO Z7 हा 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन लाँच होताच कंपनीने आधीच्या फोनच्या किंमतीत मोठी घट केली आहे. यामुळे ग्राहकांना गुढीपाडव्याच्या दिवसापासून iQOO Z6 5G फोन स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीने iQOO Z6 च्या तुलनेत iQOO Z7 5G मध्ये अनेक मोठे बदल केले आहेत.

या नव्या फोनमध्ये ग्राहकांना चांगला प्रोसेसर, ब्राइटर डिस्प्ले आणि इतर अनेक नवीन फिचर्स मिळतात. याशिवाय या बजेट फोनमध्ये कंपनीने OIS सपोर्टही दिला आहे. हा फोन लॉन्च झाल्यानंतर iQOO Z6 5G स्वस्त झाला आहे. चला जाणून घेऊया नव्या फोनवरील ऑफर्स

iQOO Z6 5G ची नवी किंमत काय?

iQOO च्या या फोनची किंमत 1000 रुपयांनी कमी झाली आहे. हा हँडसेट कंपनीने 15,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. पण आता किमतीत घट केल्यानंतर iQOO Z6 5G चे बेस व्हेरिएंट 14,499 रुपयांना उपलब्ध आहे. यासह त्याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये झाली आहे.

तर स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला HDFC बँक कार्ड आणि ICICI बँक कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळू शकते. iQOO Z7 5G ची किंमत रु.18,999 पासून सुरू होत आहे.

जाणून घ्या फोनमधील फिचर्स

iQOO Z6 5G मध्ये 6.58-इंचाचा Full HD + IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हँडसेट Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.

ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 50MP मेन कॅमेरा सेन्सर, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. त्याच वेळी, कंपनीने फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

ग्राहकांनी हा फोन घ्यावा का?

iQOO Z6 5G ज्या किंमतीला उपलब्ध झाला ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मजबूत बॅटरी आणि चांगला परफॉर्मेंस असलेला मिडल रेंजचा बजेट फोन हवा असेल तर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. किंमतीतील कपात आणि डिस्काउंट ऑफरमुळे हा फोन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन बनला आहे. यामुळे पैशांची बचतही होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या