आजच्या काळात इंटरनेटशिवाय काम करणे खूप कठीण झाले आहे. ऑनलाइनच्या या युगात, अभ्यास आणि कामापासून ते शॉपिंग आणि खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही आपल्या स्मार्टफोन आणि इंटरनेटशी जोडलेले आहे. मोबाईलमध्ये रिचार्ज प्लॅनमध्ये सामान्यतः डेटा उपलब्ध असतो परंतु लोक त्यांच्या घरात इंटरनेटसाठी वायफायही (WiFi) वापरतात. तुमच्या घरातही वायफाय असेल पण ते वारंवार स्लो होत असेल तर त्यामागील कारण काय असू शकते आणि तुम्ही त्याची काळजी कशी घ्याल हे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

WiFi पुन्हा पुन्हा स्लो होते का?

वेगवान कनेक्शन आणि अधिक डेटासाठी पैसे देऊनही, जर तुमचे वायफाय कनेक्शन वेळोवेळी स्लो होत असेल, तर त्यामागे मोठं कारण असू शकतं. अनेक वेळा असे घडते की तुमच्या घरात बसवलेले वायफायचे कनेक्शन इतके मजबूत असते की तुमच्या जवळच्या घरात राहणारे लोकही तुमचा वायफाय वापरायला लागतात. असे झाले तर तुमचे वायफाय स्लो होणे स्वाभाविक आहे.

(हे ही वाचा: ५९ रुपयांमध्ये ३GB हाय स्पीड डेटा, Airtel चे सर्वात स्वस्त प्लॅन!)

‘अशा’ प्रकारे अज्ञात कनेक्शन शोधा

तुमच्या वायफायमध्ये आणखी कोण सहभागी झाले आहे हे तुम्ही कसे शोधू शकता असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तुमच्या वायफायशी कनेक्ट केलेले प्रत्येक डिव्हाइस वेगळ्या IP आणि MAC पत्त्यासह येते, ज्याला मालकाने वेगळे नाव दिले असावे. तुम्ही तुमच्या राउटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे शोधू शकता. जर तुम्हाला तेथे काही नावे दिसली जी तुम्हाला परिचित नाहीत, तर तुम्हाला समजेल की तुमचा वायफाय कोण वापरत आहे.

(हे ही वाचा: Boat चे स्वस्त Airdopes 111 इयरबड भारतात लाँच, देतात २८ तासांचा बॅटरी बॅकअप!)

‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

आता आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्याची काळजी घेऊन तुम्ही तुमचे वायफाय खाजगी आणि सुरक्षित ठेवू शकता. प्रथम, स्ट्रॉग पासवर्डसह आपल्या घरातील वायफाय संरक्षित करा. हा पासवर्ड तुम्हाला लक्षात राहणारा असावा आणि त्याच वेळी तो कठीणही असावा. राउटरचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड बदला. ‘root’ आणि ‘admin’ सारखे सामान्य शब्द वायफाय राउटर निर्मात्यांद्वारे दिले जातात परंतु ते अगदी सोपे आणि सामान्य आहेत, म्हणून ते वेळोवेळी बदलत रहा. राउटरचा SSID लपवा आणि इंटरनेट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर वापरा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is your wifi connection slowing down know the reasons and the important things ttg
First published on: 07-02-2022 at 17:21 IST