ओपनेआय कंपनीने आपला AI ChatGpt चॅटबॉट ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लॉन्च केला आहे. हा चॅटबॉट अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. सुरूवातीला ओपनएआयच्या GPT- 3.5 मॉडेलवर चालणारे ChatGPT चा वापर लोकांकडून निबंध लिहिणे, कंटेंट तयार करणे , कविता तयार करणे अनेक प्रश्नाची उत्तरे मिळवणे अशासाठी केला जाऊ लागला. जेव्हा OpenAI ने GPT-4 ची घोषणा केली तेव्हा AI चॅटबॉटला अपडेट मिळाले. GPT-4 आणखी काही कठीण कामे करू शकतो.

ChatGpt चॅटबॉटबद्दल OpenAI चे गोपनीयता धोरण हे देखील सांगण्यात आले आहे , कंपनी व्यावसायिक हेतूंसाठी आवश्यक असल्यास नाव, ईमेल , पत्ता आणि पेमेंट यासारखी वैयक्तिक माहिती गोळा करते. लेटेस्ट अपडेटमध्ये चॅट सेव्हिंग फिचर बंद केले जाऊ शकते. तरी देखील वापरकर्त्यांचा डेटा संकलित करणाऱ्या AI टूलबद्दल चिंता कमी झालेली नाही.

हेही वाचा : Apple WWDC 2023: अ‍ॅपलच्या ‘या’ नव्या प्रॉडक्ट्सची होणार घोषणा? कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

एप्रिल २०२३ मध्ये इटलीने गोपनीयेच्या चिंतेमुळे ChatGPT वर बंदी घातली. त्यानंतर आता जपानच्या प्रायव्हसी वॉचडॉगने ओपनएआयला डेटा गोपनीयतेबद्दल चेतावणी देत म्हटले आहे की, गरज पडल्यास भविष्यात यावर कारवाई देखील केली जाईल. रॉयटर्सच्या वृत्तानुसार , जपानच्या वैयक्तिक माहिती संरक्षण आयोगाने ChatGPT तयार करणाऱ्या ओपनएआय कंपनीला एक चेतावणी दिली आहे. या आयोगाने ओपनएआयला मशीन लर्निंगसाठी संकलित केलेला संवेदनशील डेटा कमी करावा’ असे म्हटले आहे. असे न केल्यास कंपनीला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

‘जनरेटिव्ह AI च्या फायद्यांसह गोपिनीयतेसंबंधी असलेल्या चिंतेबाबत देखील संतुलनन असणे आवश्यक आहे असे वॉचडॉगने म्हटले आहे. तसेच विश्लेषण फर्म असलेल्या सिमिलरवेबच्या मते, ओपनएआयच्या वेबसाइटवर जपान हा तिसरा सर्वात मोठा ट्रॅफिक सोर्स आहे. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी एप्रिलमध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची G7 नेत्यांच्या शिखर परिषदेपूर्वी भेट घेतली होती. फुमियो किशिदा यांनी या इव्हेंटमध्ये या AI चे नियमन करण्याच्या चर्चांचे नेतृत्व केले.