scorecardresearch

Premium

एका रिचार्जमध्ये ३ सिम चालणार आणि मिळणार १५० जीबीपर्यंत डेटा, जाणून घ्या Jio-Airtel चे प्लान

अनेक कंपन्यांकडून तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधा दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत.

offer-1
एका रिचार्जमध्ये ३ सिम चालणार आणि मिळणार १५० जीबीपर्यंत डेटा, जाणून घ्या Jio-Airtel चा प्लान

अलीकडेच खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमधये फारसा फरक राहिलेला नाही. अनेक कंपन्यांकडून तुम्हाला फॅमिली कनेक्शनची सुविधा दिली जाते. दूरसंचार कंपन्यांकडे अशा अनेक पोस्टपेड योजना आहेत. आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या परवडणाऱ्या फॅमिली पोस्टपेड प्लानबद्दल सांगत आहोत.

एअरटेल ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

whatsapp increase duration status fot 2 weeks
व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर; दोन आठवडे लाइव्ह ठेवता येणार Status, जाणून घ्या सविस्तर
iPhone 14 Plus available at Rs 73,999
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट
Life and term Insurance
Money Mantra: आयुर्विम्याच्या पारंपारिक योजना- टर्म इन्शुरन्स की, एन्डोव्हमेंट अशुरन्स?
plot allotted for oxygen plant, businessman given option, businessman can start new business on the plot allotted by government
प्राणवायू निर्मात्या कंपन्यांसाठी नव उद्योगांचा गालिचा, जुन्याच भुखंडावर नवा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय खुला

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये सुद्धा दोन फॅमिली सिम आणि एक प्राथमिक सिमची सुविधा आहे. यामध्ये तुम्हाला एकूण १०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळेल. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मेंबरशिप, एअरटेल एक्सट्रीम आणि विंक म्युझिक यांसारखी मेंबरशिप अॅमेझॉन प्राइमवर मोफत उपलब्ध आहे.

जिओचा ७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान

७९९ महिन्याच्या या पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसाठी दोन अतिरिक्त सिम कार्डांसह एक प्राथमिक सिम दिले जाते. यामध्ये तुम्हाला एकूण १५० जीबी डेटा मिळतो. त्याचबरोबर २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर करू शकता. प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. पोस्टपेड प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अनेक OTT प्लॅटफॉर्मची सदस्यत्व मिळते. जिओच्या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टारसह जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

Make in India: आयफोन १३ चं भारतात उत्पादन सुरु, किंमत कमी होण्याची शक्यता

दुसरीकडे, दूरसंचार नियामक ट्रायच्या निर्देशांनंतर, दूरसंचार कंपन्यांनी ३० आणि ३१ दिवसांसाठी प्लान्स आणले आहेत किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की कंपन्यांनी calendar Month साठी रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत. पण, त्यांचे रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनपेक्षा किंचित जास्त महाग आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jio airtel plan one recharge will run 3 sims and get up to 150 gb of data rmt

First published on: 12-04-2022 at 11:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×