-
Jio Independence Day Offer: रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने स्वातंत्र्य दिनी आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी धम्माल ऑफर लाँच केली आहे. या प्लॅन अंतर्गत १ वर्षासाठी मोफत कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. (फोटो: संग्रहित फोटो)
जिओचा हा नवीन प्लॅन २,९९९ रुपयांमध्ये येत असला तरी वर्षभराच्या दृष्टीने ही खूपच उत्तम गुंतवणूक ठरेल. (फोटो: संग्रहित फोटो)
जिओ ऑफर अंतर्गत, तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एका वर्षात ९१२.५ जीबी डेटा दिला जात आहे. (फोटो: Financial Express)
यासोबतच अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि रोमिंगसह इतर ऑफरही उपलब्ध आहेत.(फोटो: Pixabay)
या पॅक अंतर्गत, कंपनी एक वर्षासाठी डिस्ने प्लस हॉट स्टार मोबाइल सेवा मोफत देत आहे, ज्याची किंमत ४९९ रुपये आहे. (फोटो: Financial Express)
तुम्हाला Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud सारख्या सेवा मोफत मिळतात. (फोटो: Indian Express)
सर्वात बेस्ट म्हणजे या प्लॅन मध्ये ग्राहकांना ७५ जीबी अतिरिक्त डेटा सुद्धा दिला जातो. (फोटो: संग्रहित फोटो)
तुम्हाला कंपनीच्या Ajio स्टोअरमधून खरेदीवर ७५० रुपये, Netmeds वरून खरेदीवर ७५० रुपये आणि Exigo वरून फ्लाइट किंवा तिकीट बुकिंगवर ७५० रुपये सूट मिळेल. (फोटो: संग्रहित फोटो)
म्हणजेच जिओच्या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना २९९९च्या गुंतवणुकीवर ३,००० रुपयांचे फायदे मिळत आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2022 रोजी प्रकाशित
Jio चा धमाका! एका रिचार्जवर मिळवा वर्षभर फ्री कॉलिंग, 3000/-हुन अधिकचे फायदे
रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने स्वातंत्र्य दिनी प्रीपेड ग्राहकांसाठी धम्माल ऑफर लाँच केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-08-2022 at 20:28 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio offers one year free calling and 75 gb extra data check recharge plans here svs