दूरसंचार नियामक ट्रायच्या निर्देशांनंतर, दूरसंचार कंपन्यांनी ३० आणि ३१ दिवसांसाठी प्लान्स आणले आहेत किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की कंपन्यांनी calendar Month साठी रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत. पण, त्यांचे रिचार्ज प्लान २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनपेक्षा किंचित जास्त महाग आहेत.

TRAI च्या आदेशानंतर, Reliance Jio ने First calendar Month चा प्रीपेड प्लॅन आणला आणि त्यानंतर Airtel आणि Vodafone Idea ने देखील महिनाभराचा प्लान सादर केला. दुसरीकडे, Vodafone Idea ने एका महिन्याच्या वैधतेसह चार प्लॅन सादर केले आहेत. कोणाला काय ऑफर केले जात आहे आणि कोणाला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ते जाणून घ्या.

रिलायन्स जिओ
Jio ने ३० दिवसांच्या रिचार्ज पॅकसाठी २९६ रुपयांचा Jio फ्रीडम प्लॅन सादर केला आहे, जो अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० SMS देतो. प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला महिन्यासाठी २५ GB डेटा देखील दिला जात आहे. यासोबतच जिओ अॅप्सचा अॅक्सेसही दिला जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कमी डेटा वापरत असाल आणि एक महिन्यासाठी रिचार्ज करू इच्छित असाल तर हा प्लॅन अधिक चांगला होऊ शकतो.

एअरटेल
एअरटेलचे दोन प्रीपेड प्लॅन आहेत ज्यांची वैधता ३० दिवस आहे. २९६ रुपयांचा असाच पॅक आहे, जो ३० दिवसांसाठी २५ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS प्रतिदिन आणि Airtel अॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह ऑफर करतो. तसंच ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३१ दिवसांसाठी दररोज २ GB डेटा दिला जातो. तसंच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० संदेश दिले जातात.

आणखी वाचा : आता Whatsapp वर फोन नंबर सेव्ह न करता चॅट करता येणार, वाचा सविस्तर

याशिवाय Airtel Amazon Prime Video चे १ महिन्यासाठी मोफत ट्रायल सबस्क्रिप्शन देखील देत आहे. येथे तुम्हाला कमी डेटा वापरण्यासाठी आणि जास्त डेटा वापरण्यासाठी दोन्ही योजना दिल्या जात आहेत, ज्यामधून तुम्ही कोणतीही एक निवडू शकता.

व्होडाफोन आयडिया
Vodafone Idea चा ३० दिवसांचा प्रीपेड प्लॅन ३२७ रुपयांपासून सुरू होतो, जो Jio आणि Airtel पॅकपेक्षा ३१ रुपये जास्त आहे. रु. ३२७ अमर्यादित कॉलिंगसह ३० दिवसांसाठी २५ GB डेटा आणि एका दिवसासाठी १०० SMS ऑफर करते. याशिवाय, ३३७ रुपयांचा प्लॅन देखील आहे, जो ३१ दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग आणि मेसेजिंग सपोर्टसह फक्त २८ GB डेटा देतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय Vodafone Idea ने रू. १११ आणि रू. १०७ चे प्लान सादर केले आहेत. १११ रुपयांसाठी, १११ रुपये प्रति सेकंद १ पैसे दराने टॉकटाइम देते आणि यामध्ये ३१ दिवसांच्या वैधतेसह २०० MB डेटा देखील दिला जातो. तर १०७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये १०७ रुपयांचा टॉकटाइम प्रति सेकंद १ पैसे दराने आकारला जातो आणि ३० दिवसांसाठी २०० MB डेटा उपलब्ध आहे.