मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी भारताने एक दशकापूर्वी अंतराळात मंगळयान हे उपग्रह पाठवले होते. मात्र त्यातील मोठ्या समस्येमुळे त्याच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे मंगळाबाबत माहिती आता मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मंगळयानातील इंधन संपल्याने मंगळाच्या कक्षेत त्याला पुन्हा सुरू करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मंगळ मोहिम बंद झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. इसरो या यानाला हाताळते. त्यामुळे मंगळयानाला पुन्हा सुरू करता येईल की नाही, याबाबत त्यांच्याकडून काही सांगण्यात आलेले नाही.

(५ जीचाही वेग ओलांडणार ‘ही’ कंपनी, १०० जीबीपीएस ब्रॉडबँड स्पीड देण्याची योजना)

मंगळयानातील इंधन संपले

मंगळयानात इंधन नसल्याची माहिती सुत्रांनी पीटीआयला दिली आहे. आता मंगळयानात इंधन नाही. उपग्रहाची बॅटरी संपली असून त्याच्याशी संपर्क तुटल्याचे इसरोतील सुत्रांनी पीटीआयला सांगितले आहे.

अलिकडेच एकामागे एक अनेक ग्रहण झालेत. यातील एक ग्रहण हा ७ तास १० मिनिटे चालला. उपग्रहाची बॅटरी ही केवळ १ तास ४० मिनिटे ग्रहणामध्ये काम करू शकते. दीर्घ ग्रहणाने उपग्रहाची बॅटरी सुरक्षित मर्यादा ओलांडून संपते, असे सुत्राने पीटीआयला सांगितले.

(5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे)

दरम्यान, मंगळयानाने त्याच्या ठरलेल्या कालावधीपर्यंत काम केलेले आहे. केवळ ६ महिन्यांपर्यंत काम करेल अशी त्याची रचना होती. मात्र त्याने मर्यादेपलिकडे जाऊन काम केले. मंगळयान आठ वर्षांहून अधिक काळ कार्य करत होते. २०१३ मध्ये मंगळयान अंतराळात सोडण्यात आले होते. केवळ ४५० कोटी रुपयांमध्ये या उपग्रहाची निर्मिती झाली होती. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजपदार्थ आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे यान मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.