जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. युजर्सना उत्तमोत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी कंपनीकडून या अ‍ॅपमध्ये सतत सुधारणा केली जात असते. नुकतंच मेटा सीईओ, मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली आहे की व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी तीन नवीन गोपनीयता फीचर्स सादर करणार आहे. या फीचर्समुळे युजर्सना मेसेजिंगदरम्यान अधिक चांगला अनुभव मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फीचर्स युजर्सना मेसेजिंगच्या वेळी आपले चॅट्स आणि सुरक्षा यांवर जास्त कंट्रोल देईल. हे नवे फीचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊया.

  • कोणालाही न कळता सोडता येणार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमुले तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला तरी कोणालाही कळणार नाही. जेव्हा युजर एखाद्या ग्रुपमधून बाहेर पडेल तेव्हा याबद्दल अ‍ॅडमिनशिवाय कोणालाही नोटीफिकेशन मिळणार नाही.

iPhone vs Android : आयफोन आणि अँड्रॉइड फोनच्या किंमतीत इतकी तफावत का? जाणून घ्या यामागची कारणे

  • तुम्हाला कोण ऑनलाइन पाहू शकेल हे निवडण्याचं स्वातंत्र्य

आपण ऑनलाइन आहोत की नाही हे आपल्या नावाच्या खाली लगेच दिसतं. पण कधी ना कधी आपल्याला आपली अ‍ॅक्टिव्हिटी सर्वांसोबतच शेअर करावीशी वाटत नाही. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमुळे आपली ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटी कोण पाहू शकेल हे स्वतः ठरवू शकणार आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही

व्हॉट्सअ‍ॅप व्ह्यू वन्स हा फोटो किंवा मीडिया शेअर करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. यासाठी कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्डची आवश्यकता नाही. आता व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षेच्या अतिरिक्त स्तरासाठी व्ह्यू वन्स मेसेज पाहताना स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यात येणार आहे. या फीचरची चाचणी सुरू असून लवकरच युजर्ससाठी आणली जाईल.