Paid Blue Badge for Facebook and Instagram: Twitter या सोशल मीडिया प्लॅटफार्मने काही दिवसांपूर्वीच ब्लू टिक साठी पेड सब्स्क्रिप्शन सुरु केले होते. त्यानंतर ट्विटरच्या वापरकर्त्यांची याबाबर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ट्विटरप्रमाणेच फेसबुकनेही एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे फेसबुक वापरकर्त्यांचे देखील टेन्शन वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपच्या मूळ कंपनी मेटाने रविवारी ब्लू टिकला पैसे मोजावे लागणार असल्याचे जाहीर केले आहे.

मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली की, कंपनी या पेड सर्व्हिस फिचरची सुरुवात सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि नन्यूझीलंड या देशांमध्ये करण्यात येणार आहे. लवकरच ही सर्व्हिस बाकीच्या देशांमध्ये देखील सुरु होणार आहे. आता यापुढे ब्लू टिकला फेसबुक आणि इंस्टाग्राम वेबसाठी प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांना $११.९९ (९९२रुपये ) आणि ioS साठी $१४.९९ (१२२७ रुपये ) मोजावे लागणार आहेत. ही पेड सर्व्हिस भारतात कधी सुरू होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये मार्क झुकरबर्ग म्हणाले की, या आठवड्यात आम्ही Meta Verified लॉन्च करत आहोत. एक पेड सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस तुम्हाला सरकारी आयडीसह तुमचे अकाउंट व्हेरीफाईड करण्याची परवानगी देणार आहे. मार्क झुकरबर्गच्या म्हणण्यानुसार, आता वापरकर्त्यांना ब्लू टिक मुळे एकाच अकाऊंटची बनावट अकाउंट्स यापासून सुरक्षा मिळणार आहे. हे नवीन फिचर फेसबुकच्या सेवांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आहे. TechDroider ने कथित मेटा हेल्प सेंटर पेजवरून काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे नवीन फिचर आमच्या सेवांमधील सुरक्षा आणि प्रामाणिकता वाढवण्यासाठी आहे. Meta Verified साठी वापरकर्त्यांनी आवश्यक बाबी पूर्ण करणे महत्वाचे आहे. तसेच यासाठीवापरकर्त्यांची वय हे १८ किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.