मेटा फेसबुक डेटिंगवर नवीन एज व्हेरिफिकेशन पद्धत उपलब्ध करणार आहे. मेटा युजरचे वय माहिती करण्यासाठी एआय फेस स्कॅनर सारख्या पद्धतीवर प्रयोग करत आहे. याबाबत मेटा आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे.

आजपासून आम्ही यूएसमध्ये फेसबुक डेटिंगवर वय पडताळणी चाचणी सुरू करत आहोत. एज व्हेरिफिकेशन टूल केवळ प्रोढ ही सेवा वापरत आहेत हे सत्यापित करण्यासाठी मदत करेल आणि अल्पवयीनांना त्यापासून दूर ठेवेल, असे ब्लॉगपोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

(खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स)

जर प्लाटफॉर्मला १८ वर्षांखालील व्यक्ती फेसबुक डेटिंग वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळली तर प्लाटफॉर्म तिला वय सत्यापित करण्यासाठी सूचित करेल. यासाठी त्यांच्यापुढे दोन पर्याय असतील. युजरला व्हिडिओ किंवा सेल्फी अपलोड करता येईल किंवा वयाची पडताळणी करण्यासाठी त्यांना ओळखपत्राची प्रत अपलोड करावी लागेल.

जर युजरने व्हिडिओ सेल्फी अपलोड करण्याचा पर्याय निवडला तर युजरला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही सूचना दिसून येतील. युजरने व्हिडिओ सेल्फी घेतल्यानंतर फेसबुक व्हिडिओमधील स्टिल इमेज ऑनलाईन एज व्हेरिफिकेशनमध्ये माहिर असलेल्या योटी या कंपनीला पाठवेल. जर युजरने वयाचा पुरवा म्हणून त्याची आयडी अपलोड करण्याचे निवडल्यास ते इनक्रिप्टेड आणि सुरक्षित ठेवले जाईल आणि फेसबुक प्रोफाईल किंवा अ‍ॅपवरील इतर लोकांना दिसून येणार नाही.

(मस्तच! ‘IPHONE’ने कोणत्याही वस्तूचे करा मोजमाप, असे वापरा ‘हे’ भन्नाट फीचर)

सध्या फेसबुक डेटिंगवर वय ओळखण्याची सुविधा यूएसमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु, फेसबुक डेटिंग उपलब्ध असलेल्या सर्व देशांमध्ये वय ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि इतर पडताळणी साधणे आणण्याची आपली योजना असल्याचे मेटाने म्हटले आहे.