WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटिफॅार्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी जवळजवळ प्रत्येक १५ दिवसांनी एखादे नवीन फिचर किंवा अपडेट लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त फिचर आणले आहे. या फीचरचा वापर कसा करता येणार आहे किंवा हे फिचर कोणते आहे ते जाणून घेऊयात.

व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांसाठी ‘Channel Tool’ आणले आहे. या टूलचा वापर आता वापरकर्ते करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्राममध्ये ही सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील हे टूल सध्या सिंगापूर आणि कोलंबिया या ठिकाणीच उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येण्याची शक्यता आहे. whatsapp ने लॉन्च केलेल्या ‘चॅनेल’ फीचरच्या मदतीने वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी खाजगीरित्या लोकांचे किंवा संस्थांचे सदस्यत्व घेऊ शकतात.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
The Boy Who Went To Express Love Got Injured By Girl
VIDEO: मरीन ड्राईव्हवर तरुणाला शहाणपणा नडला; प्रपोज करायला गेला अन् मार खाऊन आला; तरुणीनं अक्षरशः…
balenciaga bracelet looks exactly like a roll of tape internet shocked with price
लक्झरी ब्रँडने लाँच केले चिकटपट्टीसारखे दिसणारे ब्रेसलेट; किंमत जाणून तुम्हीही व्हाल अवाक्!

हेही वाचा : VIDEO: Vi ने ‘या’ युजर्ससाठी लॉन्च केले इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन, अनलिमिटेड डेटासह मिळणार…, २९ देशांचा आहे समावेश

व्हॉट्सअ‍ॅपचे चॅनेल टूल एका प्रकारे ब्रॉडकॉस्ट टूल म्हणून काम करेल. जिथे अ‍ॅडमिन टेक्स्ट, व्हिडीओ, स्टिकर किंवा पोल पाठवू शकतील. फॉलो करण्यासाठी कोणताही व्यक्ती सहजपणे चॅनल सर्च करू शकणार आहे. मेटा त्यासाठी एक डायरेक्टरी तयार करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ‘चॅनल’ ला अपडेट नावाच्या एका टॅबवर आणत आहे. या टॅबमध्ये तुम्ही फॉलो करत असलेल्या चॅनलच्या लोकांचे स्टेट्स तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर चॅटिंगचा टॅबदेखील यापेक्षा वेगळा असणार आहे. चॅनलच्या मदतीने पाठवण्यात आलेले मेसेज हे ३० दिवस स्टोअर राहणार आहेत. ३० दिवसांनंतर हे मेसेज डिलीट होणार आहेत.

WhatsApp ने आणले ‘HD फोटो ‘ फिचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटकडे लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या अहवालानुसार ‘HD फोटो ‘ हे फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. याआधी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असे. मात्र या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेले फोटो HD क्वालिटीमध्येच समोरच्याला दिसणार आहे.

हेही वाचा : आता WhatsApp वरून देखील सेंड करता येणार ‘HD’ क्वालिटीचे फोटोज, कंपनीने आणले ‘हे’ नवीन फिचर

WABetainfo या वेबसाईटने HD Photos फीचरच्या रोल आउटची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. ज्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून Android 2.23.12.13 आणि iOS 23.11.0.76 साठी whatsapp बीटा अपडेट डाउनलोड केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज बबलमध्ये एक नवीन टॅगसुद्धा जोडला आहे.